मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

MDM app download link

अलीकडील पोस्ट

स्वर ,स्वरादी ,व्यंजन

स्वर स्वरादी व्यंजन 1. स्वर : ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. र्‍हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, इ, ऋ, उ 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ स्वरांचे इतर प्रकार 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे 4 स्वर आहेत. ए...

वर्णमाला

वर्णमाला तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:  क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.