Contents 1. व्यसनमुक्ती 2. बाल भिक्षेकरी 3. बाल विवाह 4. लैगिक शोषण सिग्नलला गाडी थांबली की गाडीवर कापड मारणारी... बस स्टॅण्ड , गर्दीचे रस्ते , मंदिरे याठिकाणी केविलवाण्या नजरेनं पैशासाठी हात पसरणारी...कुठल्यातरी देवी , देवतेचे चित्र ताटात घेऊन त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारी... कधी चहाच्या टपऱ्या , खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी भांडी विसळणारी... कचरा-कोंडाळा , मोठ्या पाईप किंवा अन्य घाणेरड्या जागी व्यसने करणारी ... अशा एक ना अनेक रुपात बकाल अवस्थेत उदास चेहऱ्याने आणि शून्य नजरा घेवून फिरणारी अनेक बालकं आपणास दिसतात. कधी सरावाने आपण खिशात हात घालतो आणि एक-दोन रुपयाचं नाणं या मुलांच्या हातावर ठेवतो. कधी इतक्याच सरावानं त्यांना रागानं दूरही करतो. पण ज्या घटकांकडे तुच्छतेनं अथवा कीव करीत पाहिलं जात. त्यांच्या पुनर्वसनासाठी , त्यांच्या मदतीसाठी , त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी , त्यांन...