मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वर ,स्वरादी ,व्यंजन

स्वर स्वरादी व्यंजन 1. स्वर : ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. र्‍हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, इ, ऋ, उ 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ स्वरांचे इतर प्रकार 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे 4 स्वर आहेत. ए...