मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर २०, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड,

⚪ *सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड, microSD कार्डापेक्षा पाचपट जलद* ⚪ मोबाईल फोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने अतिजलद असे यूएफएस (यूनिवर्सल फ्लॅश स्टोअरेज) मेमरी कार्ड सादर केले असून, जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच कार्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यूएफएसच्या आगमनाने साधारण मायक्रोएसडी कार्डाच्या मागणीवर परिणाम होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मानणे आहे. यूएफएस कार्डात सामान्य कार्डापेक्षा पाच पट अधिक जलद गतीने फाईल ट्रन्सफर करण्याची क्षमता आहे. सध्या हे कार्ड ३२ जीबी, ६४ जाबी, १२८ जाबी आणि २५६ जाबी स्टोअरेजमध्ये उपलब्ध असून, ही मेमरी कार्ड्स DSLR, 3D VR कॅमेरा, अॅक्शन कॅमेरा आणि ड्रोन्स इत्यादी हाय रेझोल्युशन शुटिंग डिव्हाइसाठी निर्माण करण्यात आली आहेत. हे कार्ड ५३० एमबी प्रतिसेकंद डेटा रिड करत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जे सामान्य कार्डाच्या तुलनेत पाच पट जलद आहे. हे कार्ड ५ जीबीचा फूल एचडी चित्रपट केवळ १० सेकंदात रिड करू शकते. यासाठी सामान्य कार्डास ५० सेकंदाचा वेळ लागतो. सामान्य मायक्रोएसडी कार्डाची रिडिंग क्षमता ९५ एमबी प्रतिसेकंद असते. यूएफएस कार्डाच्या मागील...