मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर १५, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांचे वाचन प्रेरणा विषयी विचार

वाचन ..... इतरांचे विचार आत्मसात करून आपल्या मनाला दिशा देण्याचे सर्वात स्वस्त व सहज उपलब्ध होणारे साधन आहे . अतिशय कमी वेळेत इतरांच्या विचारांचा खजिना आपल्याला उपलब्ध होतो .आपले सर्व आयुष्य खर्ची टाकून स्वतःचे अनुभव इतरांसाठी खुले करण्याचा अनेक लेखकांनी प्रयत्न केला आहे . त्यांच्या अनुभवांचा खजिना  पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून दिला आहे .थोर विचारवंतांचा विचार केला तर प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या पुस्तकातील विचारांचा प्रभाव दिसून येतो . म्हणून आपले विचार बदलण्यास चांगल्या पुस्तकांचा खूप उपयोग होतो . मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत दिशा देण्याचे काम चांगली पुस्तके खूप मदत करतात . म्हणूनच म्हणतात की दिवसभरात थोडे का होईना वाचन केले पाहिजे . वाचाल तर वाचाल ! आपल्या ज्ञानाला नवी झळाळी देण्याचे काम वाचन करते . आणि सर्वांत महत्वाचे आपल्या मनाचा मोठेपणा आणि विचारांची खोली वाढविण्याचे काम वाचन करते . आपल्यापेक्षा विश्वात ज्ञानाचा खूप मोठा साठा आहे हे वाचनामुळे लक्षात येते . अहंभाव गळून पडण्यास मदत होते . इतरांचे मोठेपण , त्याग , संघर्ष , यश याबाबींची प्रचिती वाचना मुळे येते . जीवनाला एक ...

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम सादरीकरण

आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन,वाचन प्रेरणा दिन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राणंद केंद्रातील विविध शाळांत कार्यक्रम संपन्न झाले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रंथ दिंडी  काढण्यात आली.यावेळी हात धुवा दिनाचे औचित्य साधून हात कसा धुवावा याचे सप्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ज्ञान चक्षु वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले.केंद्रप्रमुख मिलिंद कांबळे यांनी सातकी,राणंद ,सोकसन या शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.

] Suraj Tupe: 🌞💐रविवारचा अभ्यास 💐

[🌞 सद्यघडीला जशी ज्या वर्गाची पैसा खर्च करण्याची ऐपत आहे, त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक मूल चौथीला थेट ऑस्ट्रेलियाचा भूगोल शिकत असते, दुसरे भारताचा अन् तिसरे सातारा जिल्ह्य़ाचा. दुसरीकडे अजूनही समाजातील मोठा वर्ग प्राथमिक शिक्षणाच्या परिघाबाहेर आहे. ही एक नवीन वर्ग व्यवस्था निर्माण होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यास आजही खासगी विनाअनुदानित शाळांचे व्यवस्थापन उदासीन आहे. दरवर्षी ‘प्रथम’ या संस्थेचा ‘असर’ हा ग्रामीण भारताच्या शिक्षणाचे चित्र मांडणारा अहवाल आला, की शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे निघतात आणि त्यावर टीका होण्यास सुरुवात होते. विविध स्तरांवरून चर्चा होते, पण निर्णायक निष्कर्षांवर येऊन उपाययोजना होताना दिसत नाहीत किंवा त्या समाजातील कोणत्याही घटकाकडून सुचविल्याही जात नाही. म्हणूनच पुण्यातील ‘व्यवस्था सुधारणा चळवळ’ (सिस्कॉम) या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य अशा विविध गरजांवर काम करणाऱ्या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक अभ्यास गट स्थापन करून राज्याच्या प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला. इतकेच नव्हे, तर त्यावर उपाययोजना...