मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी २, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डंगिरेवाडीच्या बाल आनंद मेळाव्यात अबालवृद्धही नाचले

  राणंद केंद्राच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा डंगिरेवाडी ता.माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी बालआनंद मेळावे आयोजित केले जातात.शासनाकडून त्याकरिता ७ हजार रुपये निधी उपलब्ध केला जातो. यावर्षी राणंद केंद्रातील शाळांचा मेळावा   डंगिरेवाडी ता.माण येथील प्रसिद्ध महादेव मंदिराच्या सभामंडपात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केला जाणारा चालता बोलता या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्याबरोबरच परिसरातील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी बालचमूंनी केलेला नृत्याविष्कार पाहून गावातील नागरिक भारावून गेले होते.मुलांचे नेपथ्य व नृत्य सादरीकरण पाहून ग्रामीण भागातील शाळांतूनही चांगले कलाकार घडतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.   “ राणंदचे झींग झिंग झीगाट अन सातकी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या "डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला" या गाण्याच्या ठेक्यावर नाचण्यास गावातील अबालवृद्धदेखील स्वतःल...