*प्रयोग क्र.* 3⃣1⃣ 🔘 *स्ट्रॉवरून उडवायचे रॉकेट* 🔘 📌 *साहित्य –* स्ट्रॉ, रंगीत कागद, कात्री, गोंद. 📦 *कृती –* एक चांगली कडक स्ट्रॉ घ्या. स्ट्रॉच्या लांबीइतक्या लांबीचा रंगीत कागद घ्या. स्ट्रॉचे एक टोक थोडे बाहेर राहील अशा बेताने स्ट्रॉभोवती कागदाचे तीन वेढे गुंडाळून घ्या. उरलेल्या कागद कापून घ्या. वेढ्याच्या लांबीला गोंद लावून ती नळी चिकटवून घ्या. तसेच तिचे एक टोक निमुळते करून त्यालाही गोंद लावून ते बंद करा. सुमारे ३ सेंटीमीटर आकाराचे त्रिकोण कापून घ्या. ते मध्यावर घडी घालून कागदी नळीच्या उघड्या बाजूच्या बाहेर उभ्यात गोंदाने चिकटवा. वाळले की झाले रॉकेट तयार. ते स्ट्रॉवर घालून स्ट्रॉत तोंडाने हवा फुंका, रॉकेट उडवा . 💡 *निष्कर्ष -* स्ट्रॉमधून फुंकलेली हवा कागदी नळीत कोंडली जातो तिचा दाब पुरेसा वाढला की रॉकेटची नळी फेकली जाते.
It helps to develop basic primary education