मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. २)शब्दभेंड्या खेळ घेणे. ३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे. ३)समान अक्षर जोड्या लावणे. ४)शब्दांची आगगाडी बनवणे. ५)पाहुणा अक्षर ओळखणे. ६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे. ७)बाराखडीवाचन करणे. ८)बाराखडीतक्तेवाचन करणे. ९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे. १०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे. ११)कथालेखन करणे. १२)कवितालेखन करणे. १३)चिठठीलेखन करणे. १४)संवादलेखन करणे. १५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे २)वर्गातील वस्तु मोजणे ३)अवयव मोजणे ४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे ५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे. ६)आगगाडी तयार करणे ७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे. ८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे. ९)अंकाची गोष्ट सांगणे. १०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे. ११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे. १३)बेरीजगाडी तयार करणे. १४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे १६)मणीमाळेवर १ ते १...

दप्तराचे ओझे माहिती

दप्तराचे वजन निकष ✳१ली -१.५०० kg ते २ kg ✳२ री- १.७००kg ते २kg ✳3री २.४७० kg ते २.८००kg ✳४ थी २.५०० kg ते ३.१००kg ✳५ वी ३.००० kg ते ३.५०० kg ✳६वी ३.००० kgते ३.६०० kg ✳७ वी ३.००० kg ते ३.७०० kg

MDM problems

Guaranteed fix ur MDM issue using this trick 📵टीप📵 ज्यांचा मोबाइल root नाही  पण असा  error येत आहे आपला मोबाइल backup घेऊन reset करा,कारण आपण अजाणतेपणे अनेक Dangerous Third party app install असतो त्या सर्व app चा data किंवा     जुन्या madm app( clear Cookies and wipe cache) Guaranteed solution  मोबाइल रुट असल्याने Mdmapp कसे वापरावे 👇🏻👇🏻👇🏻👇🏻  MDMApp error रुट असणाऱ्या  Device साठी Trick 1 Download Supersu And click on full unroot and reboot 2 Download Kingroot Check in option and full uprooted And reboot 3 रुट असताना कसे वापरावे Download xposed frameworkव Rootcloak plus app( only install) Kitkat user use 2.7.1 exposed Version Only install exposed Framework don't reboot Then click modules and select rootcloak and reboot. After  That open Rootcloak and add MDMApp in +section And reboot. Enjoy MDMApp with rooted Device And above4.4+ Use3.0 Alfa version Flash zip file from Custom recov...
*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी* *संकलन - शरद कोतकर* इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - *भाषा -:* * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * व...

जागतिक गणित दिन

*जागतिक गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* आयुष्याचे *गणित* चुकले असे कधीच म्हणू नये . आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो *चिन्हांचा* वापर...! *बेरीज* *वजाबाकी*, *गुणाकार*, *भागाकार* हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखे येते. आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची, कुणाला केंव्हा *वजा* करायचे , कधी कुणाशी *गुणाकार* करायचा आणि *भागाकार* करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि *उत्तर* मना-जोगते येते..! आणि मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक,मित्र आप्तेष्ट यांना *हातचा* समजू नये , त्यांना *कंसात* घ्यावे!(👨‍👨‍👦‍👦) कंस सोडविण्याची हातोटी असली कि *गणित* कधीच चुकत नाही ........!! 😊 आपल्याला शाळेत *त्रिकोण*, *चौकोन*, *लघुकोन*, *काटकोन*, *विशालकोन* इत्यादी सर्व शिकवतात.. पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो तो कधीच शिकवला जात नाही. तो म्हणजे " *दृष्टीकोन*" आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' *accounts* कधी जमलेच नाही... जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की ' *आठवण*' सोडून काहीच *bal...

Aadhar online

*Call करून काही क्षणात मिळवा आधार क्रमांक* पावती सोबत असू द्या Call करा toll free क्रमांक *18003001947* त्यानंतर भाषा निवडण्यासाठी 3⃣ Press करा. आधार नोंदवले असेल तर(पावती असेल तर) 1⃣ Press करा. आधार स्थिती जाणून घेण्यासाठी 1⃣ Press करा. त्यानंतर पावती वरील 14 अंकी नोंदणी क्रमांक Enter करा. निश्चित करण्यासाठी 1⃣ press करा. आधार क्रमांक ऐकण्यासाठी पुन्हा 1⃣ press करा. पावती वरील Pin Code Press करा. निश्चित करण्यासाठी 1⃣ Press करा. तुमचा आधार क्रमांक काळजी पूर्वक ऐका... 1⃣8⃣0⃣0⃣3⃣0⃣0⃣1⃣9⃣4⃣7⃣

आपली सूर्यमाला

📱Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿📱 *सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती* 1. ग्रहाचे नाव - बूध सूर्यापासुन चे अंतर - 5.79  परिवलन काळ - 59  परिभ्रमन काळ - 88 दिवस  इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 2. ग्रहाचे नाव - शुक्र सूर्यापासुन चे अंतर - 10.82  परिवलन काळ - 243 दिवस  परिभ्रमन काळ - 224.7 दिवस  इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 3. ग्रहाचे नाव - पृथ्वी सूर्यापासुन चे अंतर - 14.96  परिवलन काळ - 23.56 तास  परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस  इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 4. ग्रहाचे नाव - मंगळ सूर्यापासुन चे अंतर - 22.9  परिवलन काळ - 24.37 तास  परिभ्रमन काळ - 687  इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळ...

बोध कथा

बोधकथा नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते. अचानक आकाशवाणी सुरू झाली... "जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "        आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ? दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."        तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!" ...

Guruji

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर आयुष्याच्या गणिताचा भूगोल झाला असता                 ॥ १ ॥ फळयावर जर खडूचा हात फिरला नसता तर....अ ब क ड ,बाराखडीचा अर्थ कळला नसता.                   ॥ २ ॥ डोळे भरून येतात जेव्हा हातात पगार येतो. गुरूजी(सर) तुम्हीच आकार दिला, जेव्हा मातीचा मी गोळा होतो.     ॥ ३ ॥ पायथागोरस, आर्किमिडिज,  न्यूटनअजूनही तोंडपाठ आहेत गुरूजी(सर). तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या  रेणुसूत्रातमला तुम्हीच दिसता गुरूजी(सर).                          ॥ ४  ॥ तुमच्या हातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी. घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी.             ॥ ५ ॥ शाळा चुकवायचो कित्तेकदा उनाडक्या करतांना. पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासतांना.                    ॥ ६ ॥ आज...

MDM अत्यंत महत्त्वाचे

   *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.* *User ID - केंद्रप्रमुखांचा* *Password -    केंद्रप्रमुखांचा*         *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇ *खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*    https://education.maharashtra.gov.in/mdm ⬇ *त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*    *MDM Daily INFO वर क्लिक करा.* ⬇   *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख निवडा*. ⬇   *तारखेसमोरील Result वर क्लिक करा.* ⬇   *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.* ⬇ *आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा ...

*सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड,

⚪ *सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड, microSD कार्डापेक्षा पाचपट जलद* ⚪ मोबाईल फोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने अतिजलद असे यूएफएस (यूनिवर्सल फ्लॅश स्टोअरेज) मेमरी कार्ड सादर केले असून, जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच कार्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यूएफएसच्या आगमनाने साधारण मायक्रोएसडी कार्डाच्या मागणीवर परिणाम होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मानणे आहे. यूएफएस कार्डात सामान्य कार्डापेक्षा पाच पट अधिक जलद गतीने फाईल ट्रन्सफर करण्याची क्षमता आहे. सध्या हे कार्ड ३२ जीबी, ६४ जाबी, १२८ जाबी आणि २५६ जाबी स्टोअरेजमध्ये उपलब्ध असून, ही मेमरी कार्ड्स DSLR, 3D VR कॅमेरा, अॅक्शन कॅमेरा आणि ड्रोन्स इत्यादी हाय रेझोल्युशन शुटिंग डिव्हाइसाठी निर्माण करण्यात आली आहेत. हे कार्ड ५३० एमबी प्रतिसेकंद डेटा रिड करत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जे सामान्य कार्डाच्या तुलनेत पाच पट जलद आहे. हे कार्ड ५ जीबीचा फूल एचडी चित्रपट केवळ १० सेकंदात रिड करू शकते. यासाठी सामान्य कार्डास ५० सेकंदाचा वेळ लागतो. सामान्य मायक्रोएसडी कार्डाची रिडिंग क्षमता ९५ एमबी प्रतिसेकंद असते. यूएफएस कार्डाच्या मागील...

नवोपक्रम

** नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी १)अादर्श परीपाठ  २)दिनांकानुसार पाढा ३)चित्रकला स्पर्धा  ४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ५)सांस्कृतिक कार्यक्रम ६)गीतगायन स्पर्धा ७)भाषण स्पर्धा ८)क्रीडा स्पर्धा ९)वाढदिवस साजरे करणे १०)भित्तिपत्रक तयार करणे ११)निसर्गसहल  १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक  १६)हस्ताक्षर सुधार  १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज  २२)इंग्रजी संभाषण  २३)शब्द बँक  २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा,  ३१)निबंध लेखन  ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)नवरत्न स्पर्धा  ३४)दप्तराविना शाळा ३५)झुलती बाग ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)करू या आम्ही संचालने ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ...

शेवरी येथे शिक्षण परिषद संपन्न

  “ शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक देण्याची गरज आहे ”    गट शिक्षणाधिकारी   लक्ष्मण पिसे      राणंद.ता. 18, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शेवरी येथे आयोजित शिक्षण परिषदेत केले.आगामी काळात ज्याच्याकडे गुणवत्ता तोच टिकणार आहे यासाठी पायाभूत गणिती क्रिया , श्रुतलेखन , प्रकट वाचन यांचा अधिकचा सराव आवश्यक आहे.राणंद केंद्रातील शाळा उत्तम असून गुणवत्तापूर्ण , विनातक्रार केंद्र असल्याचे  श्री पिसे यांनी नमूद केले. शेवरी ता.माण येथील कै. बी.एन.हिरवे माध्यमिक शाळेत सदर शिक्षण परिषद संपन्न झाली  यावेळी परिषदेत स्मार्ट शाळा कार्यक्रमाबाबत परिपत्रकांचे , शैक्षणिक गुणवत्ता अभियान याविषयी नथुराम जाधव यांनी मार्ग दर्शन केले.तसेच शाळा स्तरावर असलेल्या विविध समित्या त्यांचे कामकाज याविषयी सुरजकुमार निकाळजे यांनी मार्गदशन केले.कदमवाडी शाळेच्या उषा कदम यांनी ज्ञानरचनावाद व गणित अध्यापन याविषयी नमुना पाठाचे सादरीकरण केले. केंद्रप्रमुखांनी शाळास्तरावरील विद्यार्थी लाभा...

आधार कार्ड माहिती कशी भरावी

*आधारकार्ड माहिती शंका आणि समाधान* L (पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल. आणि योग्य वाटली तर नक्कीच इतर अनेक ग्रुपवर शेअर करा. ) ▶ *डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे* ➡ *उत्तर*- सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला 100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे. पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी. त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे. ▶ *मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी* ➡  *उत्तर* - Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click करा.*        आता तुम्हाला त...

व व्याकरणाचा

📗💥 Ⓜ🅰🅿 💥 📗 🖊 *संकलन*   *संदिप सोनार , जामनेर* 💥 *लिंग विचार* 💥 *नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.* मराठी भाषेत *लिंगाचे तीन प्रकार* पडतात. *1. पुल्लिंगी      2. स्त्रीलिंगी       3. नपुसकलिंगी*  *पुल्लिंगी* : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ. *स्त्रीलिंगी* : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ. *नपुंसकलिंगी*: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ. *लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल* 💥 *नियम : 1* 💥 'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.     उदा :  1. मुलगा - मुलगी - मूलगे             2. पोरगा - पोरगी - पोरगे             3. कुत्रा - कुत्री -...

विचार शलाका

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.     🌅 *चिंता* *केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत* *नाही,* *पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग सापडतो....* *कोणी "कौतुक" करो वा "टिका"....* *लाभ तुमचाच आहे .....* *कारण..... कौतुक "प्रेरणा" देते,* *तर टिका "सुधारण्याची" संधी...!!!* 🌅 *माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, *वैतागाला कारणीभूत ठरत असतो.* *अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.* ☄ *सोडून द्या :* *दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.* ☄ *सोडून द्या :* *दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.* ☄ *सोडून द्या :* *दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.* ☄ *सोडून द्या :*...

सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत*

*सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत* 🔰🔰🔰🔰N🔰🔰🔰🔰 ✅   *मागील वर्षी ला नोंदणी करायचे राहिलेले विद्यार्थी* ✅  *वयानुरूप दाखल मुले* ✅  *पुनप्रवेश* ✅  *परराज्यातुन दाखल मुले.* ✅ *अनधिकृत शाळेतून दाखल मुले* अशा सर्व विद्यार्थी नोंदणी साठी *आपल्या शाळेला beo login वरून एक tab आपल्या शाळेला जोडून दिली जाते beo login वरून विद्यार्थी नोंदणी करता येत नाही फक्त tab जोडून दिली जाते*हे लक्षात घ्यावे tab जोडून दिल्यावर करावयाची process संकलन *गोरक्ष सोनवणे* जि.प.शाळा दापूर ता.सिन्नर जि.नासिक 💠student port वर जाऊन hm roll निवडून आपल्या शाळेचे login करा 💠त्यानंतर आपणास screen वर new entry tab दिसेल त्या खालील sub tab click करा 👉🏼personal व home यापैकी *personal* वर click करा 🚸विदयाथीँ from open होईल आपल्या शाळेतील ज्या ज्या वर्गातील विद्यार्थी नोंदणी करायचे राहिले असे सर्व विद्यार्थी अचुक इयत्ता निहाय भरा *लक्षात घ्या एका वेळी एकच विद्यार्थी नोंद करून save करा असे एक एक विद्यार्थी भरून घ्या व save करत चला* 🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡 आपण भरलेले विद्यार...

शालेय अभिलेख

=====================   संकलन:विजय बनसोडे माण सातारा .......................🌴 ==================== 📚शालेय अभिलेख प्रकार व जतन कालावधी📚 ==================== शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात 📚१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे 📘दाखल खारीज रजि स्टर, 📓पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर, 📗जन्म प्रमाणपत्र फाईल, 📕शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर, 📙विद्यार्थी हजेरी रजिस्टर, 📒टी.सी. फाईल, 📔टी.सी. जावक रजिस्टर, 📘निकाल रजिस्टर, 📔बढती रजिस्टर, 📓गळती रजिस्टर, 📗मूल्यमापन नोंदवही, 📒बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर, 📘अपंग विद्यार्थी रजिस्टर 📚२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे📖 📘शिक्षक हजेरी रजिस्टर, 📒पगारपेड रजिस्टर, 📗शिक्षक सुचना रजिस्टर, 📓शिक्षक हलचल रजिस्टर, 📕शिक्षक रजेचे रजिस्टर, 📙शिक्षक रजा अर्ज फाईल, 📔वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर, 📔मासिक अभ्यासक्रम 📘प्रगतिपत्रक रजि., 📒पाठ टाचण वही, 📓पगारपत्रक फाईल, 📗मुख्याध्यापकांचे लॉगबुक 📚३) आर्थिक अभिलेखे 📖 📘स.शि.अ. रोकड रजिस्टर, 📗स.शि.अ. खर्चाची पावती फाईल, 📓स.शि.अ. लेजर रजिस्टर, 📔सादी...

महात्मा जोतिबा फुले

-: महात्मा जोतिबा फुले :- ( इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९० ) हे मराठी, भारतीय समाज सुधारक होते. बालपण त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोर्हे हे मूळ आडनाव होते. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी सावित्री बाईंना शिक्षित करून शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामां प्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिके तील कृष्ण वर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितां कडून होणार्या अन्याय, अत्याचारा पासून , गुलाम गिरीतून शूद्राति शूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जा...

E- school: एखादी फाईल Excel मधून PDF , 97-2003 .CSV अशा प्रका...

E- school: एखादी फाईल Excel मधून PDF , 97-2003 .CSV अशा प्रका... : वरील व्हिडिओ मध्ये खालील प्रकारची माहिती दिली आहे. एखादी Excel फाईल आपण आपल्या PC वर तयार केल्यानंतर ती दुसऱ्या PC वर उघडण्यासाठी त्या...

भरतीय संविधान एक तुलनात्मक अभ्यास

भारतीय संविधान जगातले सगळ्यात महान "संविधान " इतर देशातील संविधानाचा तौलनिक अभ्यास .... अमेरिका :- १) ,अमेरिकामध्ये -- १)राज्य आणि देश्यामध्ये एक करार आहे .त्यामुळे अमेरीकातील राज्ये कधीही वेगळी होऊ शकतात .२)प्रत्येक राज्याचे व देशाचे वेगळे नागरिकत्व घ्यावे लागते .दुहेरी नागरिकत्व घ्यावे लागते .. ३)दोन पार्टी निवडणूक असते ...राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असतो २) इंग्लंड :- १)आजही इंग्लंडमध्ये पूर्ण लोकशाही नाही कारण इंग्लंडची आजही प्रमुख ही राणी असते घराणे शाही . २).इंग्लंडचे हि कधीही तुकडे होऊ शकतात ..उदा ,...स्कॉटलंड चा उठाव ,.... ३) रशिया :- १)रशियामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण मुलभूत हक्क मिळत नाहीत . २)व्यवसाय स्वतंत्र ,तसेच तुम्ही घटनेच्या विरुद्ध बोलू शकत नाही ... .काही गोष्टी ह्या हुकुमशाही पद्धतीने लादल्या आहेत ... उदा .. उक्रेन ..आणि क्रीमिया ४) चीन :- १)चीनमध्ये लोकशाही नाही ,सगळी सत्ता हि एकाच पार्टी च्या हाती असते . २)ते प्रतिनिधी हे अप्रत्यक्ष निवडले जातात चीनमध्ये कधीही तुकडे होऊ शकतात ..उदारण सिंगापूर चा उठाव ...मकाऊ ,तसेच तैवान ... बाकीच्या देश्या...

Good Thought

✍�... " *जन्म* हा एका *थेंबासारखा* असतो,               *आयुष्य* एका *ओळीसारखं* असतं, *प्रेम* एका *त्रिकोणासारखे* असतं पण               *मैत्री* असते ती *वर्तुळासारखी*, ज्याला कधीच *शेवट* नसतो..! "       🌺🍃 शुभ सकाळ🍃🌺 🍃

विश्वास नांगरे पाटील IPS,India यांचा लेख..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏                         Plz read this messags  विश्वास नांगरे पाटील IPS,India यांचा लेख.. तुम्ही कोण आहात ? In तुम्ही कोण आहात ? गाढव 'अ' कि गाढव 'ब' ?  .... हि आहे दोन गाढवांची गोष्ट ! एका धोब्याकडे दोन गाढवं होती. आपण त्यांना गाढव 'अ' आणि गाढव 'ब' असे म्हणू .... गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे. गाढव 'ब' त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे. हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे ...

प्रशांत

✳🌺🌺🌺🌺🌺🌺🌺सावित्री बाई फुले शिष्य वृत्ती साठी/मॅट्रीकपुर्व शिष्यर्ववृत्ती साठी Online form नवीन व नुतूणीकरण  करणेसाठी संकेत स्थळ सुरू केले बाबत✳सर्व मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येत आहे.चालू सत्राचे Online formभरणेसाठी scholarship वर Click➡लाॅगीन समाज कल्याण विभाग Click➡New window open➡User name टका उदा.HM.WAS27060124001➡HM. हे (HM डाॅट) कंपलसरी➡आपल्या जिल्हा पहिली तीन अक्षरे➡उदा.माझा जिल्हा WASHIM✳व युडाईस नंबर ➡व पासवर्ड Pass123 /Pass1234 हा default आहे✳पासवर्ड आधी बनवला असेल तर No Problem🌺ढोणे सर 🌺✳

Let's become technosavvy

⚪ *तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डर साठी hotkey कशी तयार करावी?* ⚪ तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करतांना ब-याच वेळा अनेक डॉक्युमेंट, फोल्डर किंवा काही अॅप्लीकेशन हे पुन्हा पुन्हा लागत असतात. मग अश्या वेळी प्रत्येक वेळेस ते ओपन करतांना खुप वेळ तसेच मेहनत लागते जो तुम्ही यासाठी एक शॉटकट कि ठरवून वाचवू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हव्या त्या फाईल, फोल्डर किंवा अॅप्लीकेशनला hotkey ठरवू शकता, जेणेकरुन कमी परिश्रमात ते सहज ओपन करता येतील. कशी तैयार करायची hotkey ???? जाणून घ्या..... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 *अधिक माहितीसाठी व इतर ज्ञानवर्धक व्हाट्सएप्प ग्रुपवर सहभागी होण्यासाठी भेट दया...* *umedhdhaware.blogspot.in* 🔘 *संकलन*🔘      *उमेध धावारे*         *हवेली*

Be the CEO of your own Life

अप्रतिम लेख .... .....परत परत वाचा नक्की वाचा......  ... बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात... 👌👌👌👌👌👌 दोन दिवसांपूर्वीची गोष्ट.. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नांवाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.) माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून म...

Teacher's day

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐*शिक्षक आणि रस्ते*  *दोघांत एक साम्य आहे ...*           *स्वतः जिथे आहे तिथेच  राहतात.*                  *परंतु दुसऱ्यांना मात्र*            *त्यांच्या ध्येयापर्यंत* *पोहचवतात.*   🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy teachers day

कर्तव्याप्रती असलेली निष्ठा , विद्यार्थ्यांविषयी असलेली अपार तळमळ , कार्यासाठी लागणारी चिकाटी , प्रयत्नातील सातत्य , ध्येयप्राप्तीसाठी हवं असलेलं पावित्र्य या साऱ्याच फलित म्हणजे खरा - खुरा *आदर्श शिक्षक*    ' *विद्यार्थी* हेच  खरे  न्यायाधीश ' हे सुत्र मानणार्या माझ्या सर्व ज्ञात - अज्ञात शिक्षक बंधु - भगिनींना *शिक्षक दिन* या पवित्र ,मंगलमय आणि प्रासादिक सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *!!वक्रतुंड, महाकाय सूर्य कोटी समप्रभ !! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वद !!* सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया....!! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *उमेध धावारे*     *हवेली*
दि.29/08/2016 सोमवार रोजी दुपारी साधारण तिन च्या सुमारास मंञालय मुबई येथे शिक्षण प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या अति सुरक्षितता असलेल्या अँन्टी चेंबर मध्ये चर्चा  करताना कला,क्रिडा व कार्यानुभव या पदावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील अतिथी निदेशकांनच्या शिष्टमंडळाने निवेदन देवुन भेट घेतली. त्या वेळेस शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व बुलढाणा जिल्ह्यातील अतिथी निदेशक सय्यद जहीर सर,औरंगाबाद जिल्ह्यातील अतिथी निदेशक शेख अखिल सर,लातूर जिल्ह्यातील अतिथी निदेशक ज्ञानेश्वर घोगरे सर,आळणे सविता मँडम,नंदुरबार जिल्ह्यातील अतिथी निदेशक कोकणी राजेश सर,सोनवणे सुनिल सर,अकोला जिल्ह्यातील आतिथी निदेशक सुनिल गिरी सर,अन्सारी सर,इरफान सर,आव्हारे सर आशा दहा लोकानच्या महाराष्ट्रातील अतिथी निदेशकानच्या शिष्टृमंडळाने शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांची भेट घेतली. शिक्षण सचिव नंदकुमार ने  तर आमच्या शिष्ट मंडळावर भडका काढला कारण काय तर आम्ही न्याय मागन्यासाठी औरंगाबाद उच्य न्यायालयात जावुन शासनाच्या विरूद्ध  याचीका दाखल केली म्हणुन व पुढे चालुन न्यायालयाचा निकाल आमच्या सारखा लागला म्हणुन शिक्षण सचि...

MCSC

💎 💎 राज्यसेवा परीक्षा किंवा एमपीएससी 💎 💎 ► केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेप्रमाणेच राज्याराज्यांमध्येही अशाच अधिकारीपदाच्या परीक्षा घेतल्या जातात. ► उपजिल्हाधिकारी, ► पोलीस उपअधीक्षक, ► साहाय्यक पोलीस आयुक्त, ► तहसीलदार, ► मंत्रालयातील कक्ष अधिकारी, ► सहकार तालुका उपनिबंधक, ► जिल्हा उपनिबंधक, ► विभागीय सहनिबंधक, ► महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा, ► साहाय्यक विक्रीकर आयुक्त, ► उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ► गटविकास अधिकारी, ► राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, ► साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ► अशा विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोग परीक्षा घेतो. ► महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या परीक्षा घेतल्या जातात. केंद्रीय परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेचा केंद्रबिंदू महाराष्ट्र राज्य व भारत इतका मर्यादित असतो. तर आयएएससाठी हाच केंद्रबिंदू भारत व इतर राष्ट्रे असा असतो. 💎 💎 परीक्षापद्धती ► या परीक्षा राज्यसेवा म्हणून ओळखल्या जातात. येथे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असाच क्रम असतो. ► येथे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा बहुप...

HM workshop at ZP school Sokasan

Article by Suraj Tupe

💐रविवारचा अभ्यास💐 @इंटरनेटचा प्रवास@ [03/09 8:43 AM] Suraj Tupe: इंटरनेट युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली . यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, . त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या@चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील. पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली.  १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल  यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला, ज्याप्रकाराला नंतर स्पॅम (spam) असे म्हटले गेले. १७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या अक्षरांद्...

D.A.

राज्य कर्मचार्‍यांना ६ टक्के महागाई भत्ता मुंबई : शासनाने आज राज्य शासकीय कर्मचार्‍यांना १ सप्टेंबर २0१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१६दरम्यानची थकबाकी देण्याबाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. जे शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता देय असणारे पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणी घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतन यावरील महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २0१६पासून ११ टक्के इतका वाढविण्याचा निर्णयही शासनाने आज घेतला. १ सप्टेंबरपासून तो रोखीने देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

MDM agreement

*शालेय पोषण आहार योजना करारपत्र ( स्टँप पेपरसाठी )* शालेय पोषण आहार योजना सन २०१६-१७ स्वयंपाकी नेमणूक करारपत्र संदर्भ :- १) केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना २००६  २) केंद्रशासन आदेश क्र.F.NO.१-१/२००९ – DESK (MDM )दि.२४/११/२००९  ३) केंद्रशासन आदेश क्र. F.NO.३-५/२०१०– DESK (MDM )दि.२९/०४/२०१०  ४) शिक्षण संचालक (प्राथ)यांचे पत्र क्र.शा.पो.आ./सु.यो./२०१०-११/प्राशिस/३०३/३४०९/ दि.१९/१०/२०१०  ५) शासन निर्णय क्र.शापोआ २०१०/प्र.क्र.१८/ प्राशि/ दि.२/२/२०११  ६) मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)......यांचेकडील पत्र दि.०२/०४/२०१० वरील संदर्भीय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती– -------------यांचेमार्फत श्री/श्रीमती ------------यांची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात स्वयंपाकी म्हणून नेमणूक खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबधितांची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील. १. अन्न शिजवण्याचे काम करणे . २. ...