मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिंदगी हमारी है

आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात. १) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय? २) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे? चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कोणी कशाला सांगायला हवं? - आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो *१)जे कराल, ते उत्तम करा!* विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात  असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा! *२) इन्व्हॉल्व्ह व्हा* आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा. *३)थोडंसं एक्स्ट्रा* लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त ...