मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर २, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

D.A.

राज्य कर्मचार्‍यांना ६ टक्के महागाई भत्ता मुंबई : शासनाने आज राज्य शासकीय कर्मचार्‍यांना १ सप्टेंबर २0१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१६दरम्यानची थकबाकी देण्याबाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. जे शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता देय असणारे पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणी घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतन यावरील महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २0१६पासून ११ टक्के इतका वाढविण्याचा निर्णयही शासनाने आज घेतला. १ सप्टेंबरपासून तो रोखीने देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

MDM agreement

*शालेय पोषण आहार योजना करारपत्र ( स्टँप पेपरसाठी )* शालेय पोषण आहार योजना सन २०१६-१७ स्वयंपाकी नेमणूक करारपत्र संदर्भ :- १) केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना २००६  २) केंद्रशासन आदेश क्र.F.NO.१-१/२००९ – DESK (MDM )दि.२४/११/२००९  ३) केंद्रशासन आदेश क्र. F.NO.३-५/२०१०– DESK (MDM )दि.२९/०४/२०१०  ४) शिक्षण संचालक (प्राथ)यांचे पत्र क्र.शा.पो.आ./सु.यो./२०१०-११/प्राशिस/३०३/३४०९/ दि.१९/१०/२०१०  ५) शासन निर्णय क्र.शापोआ २०१०/प्र.क्र.१८/ प्राशि/ दि.२/२/२०११  ६) मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)......यांचेकडील पत्र दि.०२/०४/२०१० वरील संदर्भीय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती– -------------यांचेमार्फत श्री/श्रीमती ------------यांची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात स्वयंपाकी म्हणून नेमणूक खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबधितांची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील. १. अन्न शिजवण्याचे काम करणे . २. ...