*. Govt. Scheme: 26 October 2016* 1. _*डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना*_ ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू केली आहे. _*वैशिष्ट्ये*_ * शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळणार. * या योजनेत मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन हजार रुपये (वार्षिक 30 हजार रुपये) तर या शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा दोन हजार रुपये (वार्षिक 20 हजार रुपये) वसतिगृह निर्वाह भत्ता मिळणार. * या योजनेची अंमलबजावणी 2016-17 या शैक्षणिक वर्षापासूनच होणार. 2._*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना*_ शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्याचा ...
It helps to develop basic primary education