मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर २२, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Guruji

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर आयुष्याच्या गणिताचा भूगोल झाला असता                 ॥ १ ॥ फळयावर जर खडूचा हात फिरला नसता तर....अ ब क ड ,बाराखडीचा अर्थ कळला नसता.                   ॥ २ ॥ डोळे भरून येतात जेव्हा हातात पगार येतो. गुरूजी(सर) तुम्हीच आकार दिला, जेव्हा मातीचा मी गोळा होतो.     ॥ ३ ॥ पायथागोरस, आर्किमिडिज,  न्यूटनअजूनही तोंडपाठ आहेत गुरूजी(सर). तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या  रेणुसूत्रातमला तुम्हीच दिसता गुरूजी(सर).                          ॥ ४  ॥ तुमच्या हातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी. घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी.             ॥ ५ ॥ शाळा चुकवायचो कित्तेकदा उनाडक्या करतांना. पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासतांना.                    ॥ ६ ॥ आज...