मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट २७, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Thoughts of APJ.

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. --------------------------------------------- 👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. 👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्यासाठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा...

शाळा म्हणजे काय? लेखक सुरज देविदास तुुपे

           🌞Suraj Tupe:🌞 माणसाच्या सुजाण होण्याच्या वाटा शाळेशी जुळलेल्या असतात. शाळा शब्दासोबत केवळ अभ्यास, परीक्षा, पुस्तके, शिक्षक आणि शिकणे एवढंच चित्र नजरेत उभं राहत नाही. एक विशिष्ट प्रतिमा शाळा नाव धारण करून मनाच्या कॅनव्हॉसवर प्रकटते. इमारत, क्रीडांगण, भौतिकसुविधांसोबत शाळेचा आसमंत चैतन्याचा गंधाने भरलेला असतो. मुलांच्या रूपाने चैतन्याचे प्रवाह प्रवाहित होत राहतात. या उत्साहाला आपल्यात सामाऊन घेणारा परिसर जगण्याचं समृद्धपण सोबत घेऊन उभा राहतो. शाळा आणि शिक्षक हे परस्परांना पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शाळा शब्दांमध्ये जगणं आकाराला आणण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी माणूस जे काही करीत आला, त्यातील जीवनाच्या जडणघडणीची एक वाट शाळेकडे जाते. सक्षम व्यक्तित्वे घडविण्यासाठी शाळा नावाचे स्त्रोत माणसांनी निर्माण केले. त्यास नवे आयाम दिले. सद्विचारांचे मळे येथे फुलत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त होत राहिली. काळाचे अनेक आघात झेलत ही व्यवस्था वाढत राहिली. माणसाला जाणीवपूर्वक घडावे लागते....
®rahul @thare   *मुलांचाअभ्यास कसा घ्याल??*📚📝🖍✏🖊📖📖 मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबन ,सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणाचे केंद्र आहे व अभ्यासक्रम हे संस्कृतीसंवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल. शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत  नाही. बऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या असतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एक...

मुलांचे विश्व व पालकांची भूमिका

मुलांच विश्वच वेगळं असतं ते त्यातच रममान असतात. लहान मुलांचा आनंद व दुःख वेगळे असते पालकांनी स्वतःची दुःख आणि आनंद मुलांवर थोपवू नये त्यांच्या problems च आेझं त्यांनी स्वतः उचलावं. उलट पालकांनी स्वतःचे tention विसरून मुलांच्या अानंदात व दुःखात सामील व्हायला हवे तरच मुलांचा शारीरीक आणि मानसिक विकास चांगला होईल व पुढे चालून तो भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम होईल.  लेखक श्री.अजय गायकवाड पदवीधर शिक्षक जालना