मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बोधकथा

वेळ काढुन वाचाच               👇 😌😌 कालबाह्य परंपरा मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे... एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला. थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते . तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर  उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं. दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते. असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे. मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते तेंव्हा इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते. यामुळे त्या...

सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास

[26/08 7:41 AM] Suraj Tupe: ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. शिक्षण व जीवन यांचा परस्परसंबंध आहे; ज्ञानाकरिता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे, तसेच शक्य तेथे व्यवहारातही त्याच उपयोग करता आला पाहिजे, हेही युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन आणि कौशल्यांची प्राप्ती यांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच अनेक दृष्टीकोन व मूल्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञानसंक्रमण नसून विद्यार्थांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीची विकास करणारे, त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणारे, त्यांना चांगल्या सवयी लावणारे, त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास करणारे, त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना आणि त्यांच्या सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास करणारे अध्यापकाचे कार्य, म्हणजे अध्यापन होय.  संदर्भ : 1. Barnard, H. C. An Introduction to Teaching, London, 1965.   ...

SCHOOL CHALE HAM

प्रास्ताविक

                                              http://crcranand.blogspot.in            हा सातारा जिल्हा परिषद अंतर्गत माण पंचायत समिती शिक्षण विभागातील राणंद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सातकी या शाळेतील तंत्रास्नेही शिक्षक श्री .सुरजकुमार चंद्रकांत निकाळजे यांनी तयार केलेला शैक्षणिक ब्लॉग असून त्याद्वारे शैक्षणिक,सामाजिक माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. शैक्षणिक ब्लॉग तयार करण्याकामी पंचायत समिती माणचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.लक्ष्मणराव पिसे साहेब,विस्तार अधिकारी श्रीमती संगीता गायकवाड,केंद्रप्रमुख मा.श्री.मिलिंद कांबळे साहेब,तसेच तंत्रस्नेही चळवळीचे आद्यपुरुष मा.श्री.रामजी सालगुडे,मा.श्री.बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य व प्रेरणा दिली  हा ब्लॉग सेवेत देताना विशेष आनंद होत आहे.कारण याद्वारे प्राथमिक शिक्षणाच्या दिशा विस्तारणार असून माण सारख्या दुष्काळी भागातील प्राथमिक शाळांची माहिती देश विदेशात पोहचण्याचा नवा मार्ग निर्म...