💐रविवारचा अभ्यास💐 @इंटरनेटचा प्रवास@ [03/09 8:43 AM] Suraj Tupe: इंटरनेट युगाची खर्या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली . यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, . त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या@चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील. पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली. १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला, ज्याप्रकाराला नंतर स्पॅम (spam) असे म्हटले गेले. १७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या अक्षरांद्...