“ शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक देण्याची गरज आहे ” गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे राणंद.ता. 18, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शेवरी येथे आयोजित शिक्षण परिषदेत केले.आगामी काळात ज्याच्याकडे गुणवत्ता तोच टिकणार आहे यासाठी पायाभूत गणिती क्रिया , श्रुतलेखन , प्रकट वाचन यांचा अधिकचा सराव आवश्यक आहे.राणंद केंद्रातील शाळा उत्तम असून गुणवत्तापूर्ण , विनातक्रार केंद्र असल्याचे श्री पिसे यांनी नमूद केले. शेवरी ता.माण येथील कै. बी.एन.हिरवे माध्यमिक शाळेत सदर शिक्षण परिषद संपन्न झाली यावेळी परिषदेत स्मार्ट शाळा कार्यक्रमाबाबत परिपत्रकांचे , शैक्षणिक गुणवत्ता अभियान याविषयी नथुराम जाधव यांनी मार्ग दर्शन केले.तसेच शाळा स्तरावर असलेल्या विविध समित्या त्यांचे कामकाज याविषयी सुरजकुमार निकाळजे यांनी मार्गदशन केले.कदमवाडी शाळेच्या उषा कदम यांनी ज्ञानरचनावाद व गणित अध्यापन याविषयी नमुना पाठाचे सादरीकरण केले. केंद्रप्रमुखांनी शाळास्तरावरील विद्यार्थी लाभा...
It helps to develop basic primary education