शिक्षणाची वारी २०१६ च्या निमित्ताने दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी बालेवाडी पुणे येथे जाण्याचा योग आला.सतत नव्याचा ध्यास असणारे माणचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांच्या प्रेरणेने माण मधील १९ नवोपक्रमशील शिक्षक व २३ ज्ञानरचनावादी शिक्षकांचा एक गट खास शिक्षणाची वारी बालेवाडी पुणे येथे भेट देण्यासाठी गेला होता. माण व्हिजन या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कुमठे बीटच्या मा.प्रतिभा भराडे यांच्या प्रेरणेने , जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण , शिक्षण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माण येथे तालुक्यातील ५७ शिक्षकांची विशेष कार्यशाळा संपन्न झाली होती.यामध्ये सौ.उषा गोरे व सौ.अफजल काझी या दोन शिक्षिकांनी कुमठे बीटामध्ये राबविलेल्या ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले. माण व्हिजन कार्यशाळेतील २३ शिक्षकांनी पुणे येथे शिक्षणाच्या वारीस प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ज्ञान घेवून त्याची महती व माहिती संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करावे अशा हेतूने पुण्यास पाठविले. शिक्षणाच्या वारीत विविध प्रकारचे एकूण ५२ शैक्षणिक मा...
It helps to develop basic primary education