♿ आज 3 डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अपंगत्व तुमच्या मनात आहे, माझ्यात नाही, हे सांगणाऱ्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊ... *1) हेलन केलर* : मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व व अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या त्यांच्यावर कोसळली. या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका व समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या. *2) लुईस ब्रेल* : वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे. *3) सुधा चंद्रन* : एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली. *4) ऑस्कर पिस्टोरियस* : पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्र...
It helps to develop basic primary education