● मुख्याध्यापकांची कामे- RTE-2009 नुसार RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे १) वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश दयावा. शाळेत दाखल करतांना पालकाजवळ वयाबाबतचा सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले पाहिजे. २) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे. बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा. ३) विदयार्थ्याचे स्थलांतरण– पालकाचे अथवा बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास विदयार्थ्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र घ्यावे. असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा दाखला हस्तांतरण करावा. ४) वयानुसार प्रवेश- एखादा बालक दुस-या ठिकानावरून गावात राहण्यासाठी येत असेल तर त्याला त्याच्या वयोगटानुसार प्रवेश दयावा. नंतर त्याचा दाखला मिळत...
It helps to develop basic primary education