राज्य कर्मचार्यांना
६ टक्के महागाई भत्ता
मुंबई : शासनाने आज राज्य शासकीय कर्मचार्यांना १ सप्टेंबर २0१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१६दरम्यानची थकबाकी देण्याबाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. जे शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता देय असणारे पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणी घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतन यावरील महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २0१६पासून ११ टक्के इतका वाढविण्याचा निर्णयही शासनाने आज घेतला. १ सप्टेंबरपासून तो रोखीने देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा