मुख्य सामग्रीवर वगळा

Article by Suraj Tupe

💐रविवारचा अभ्यास💐 @इंटरनेटचा प्रवास@ [03/09 8:43 AM] Suraj Tupe: इंटरनेट युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली . यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, . त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या@चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील.
पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली.
 १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल  यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला, ज्याप्रकाराला नंतर स्पॅम (spam) असे म्हटले गेले.
१७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या अक्षरांद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात झाली. १९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली.
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील पहिल्या गप्पागोष्टींचे सहक्षेपण (Internet Relay Chat) केले
१९८९ मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच AOL (America Online) ची निर्मिती झाली. ज्यामूळे नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये इंटरनेट लोकप्रिय होण्यास कारणीभूत झाला. त्याच साली म्हणजे १९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) ही संकल्पना टीम बर्नर-ली (Tim Berners-Lee) यांनी अस्तिताव आणली. जी पूढे खऱ्या अर्थाने १९९० पासून सुरु झाली.
. १९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले. १९९० साली एमपीथ्री (MP3) या प्रकाराला सुरुवात झाली.  १९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरु झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली.
१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी वेबसाइट सुरु झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला.
२००१ मध्ये विकिपीडिया (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटने आवाज पोहोचवला.
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये युट्युब (YouTube) या विडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरु झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) सुरु झाली.
२००७ मध्ये ऍपल कंपनीच्या आयफोनद्वारे मोबाईल वेब प्रणाली उदयास आली.
 सन 2009मध्ये आपण ज्या व्हाॅटस्अपने एकत्र आलो त्याचा शोध ब्रियन अॅक्टन व जान कौम यांनी लावला.इंटरनेटवर दररोज नवनविन कल्पना समोर आल्या. सध्या दिवसागणिक हजारो वेबसाइटची निर्मिती होत आहे. सर्व विषयावरील, क्षेत्रातील, भाषांच्या, व्यक्तींच्या, कंपन्यांच्या, संस्थाच्या माहितीनी इंटरनेटचे जग प्रसरण पावत आहे. भविष्यामध्ये हे इंटनेटचे विश्व आकाशाप्रमाणे अनंत होईल यात शंका नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...