मुख्य सामग्रीवर वगळा

शेवरी येथे शिक्षण परिषद संपन्न

 शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक देण्याची गरज आहे   गट शिक्षणाधिकारी  लक्ष्मण पिसे   
 राणंद.ता.18, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शेवरी येथे आयोजित शिक्षण परिषदेत केले.आगामी काळात ज्याच्याकडे गुणवत्ता तोच टिकणार आहे यासाठी पायाभूत गणिती क्रिया ,श्रुतलेखन,प्रकट वाचन यांचा अधिकचा सराव आवश्यक आहे.राणंद केंद्रातील शाळा उत्तम असून गुणवत्तापूर्ण,विनातक्रार केंद्र असल्याचे  श्री पिसे यांनी नमूद केले.

शेवरी ता.माण येथील कै. बी.एन.हिरवे माध्यमिक शाळेत सदर शिक्षण परिषद संपन्न झाली  यावेळी परिषदेत स्मार्ट शाळा कार्यक्रमाबाबत परिपत्रकांचे,शैक्षणिक गुणवत्ता अभियान याविषयी नथुराम जाधव यांनी मार्गदर्शन केले.तसेच शाळा स्तरावर असलेल्या विविध समित्या त्यांचे कामकाज याविषयी सुरजकुमार निकाळजे यांनी मार्गदशन केले.कदमवाडी शाळेच्या उषा कदम यांनी ज्ञानरचनावाद व गणित अध्यापन याविषयी नमुना पाठाचे सादरीकरण केले. केंद्रप्रमुखांनी शाळास्तरावरील विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची माहिती दिली व शाळानिहाय आढावा घेतला.प्रारंभी बी. एन हिरवे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना हिरवे- पाटील यांचे हस्ते मान्यवरांचे शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.श्री यादव यांनी प्रास्ताविक केले.मंगल कुंभार यांनी आभार मानले. कलाशिक्षक श्री. गुजर यांनी उत्तम फलकलेखन केले,याप्रसंगी राणंद केंद्रातील सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.            






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...