मुख्य सामग्रीवर वगळा

*सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड,

⚪ *सॅमसंगचे UFS मेमरी कार्ड, microSD कार्डापेक्षा पाचपट जलद* ⚪

मोबाईल फोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने अतिजलद असे यूएफएस (यूनिवर्सल फ्लॅश स्टोअरेज) मेमरी कार्ड सादर केले असून, जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच कार्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यूएफएसच्या आगमनाने साधारण मायक्रोएसडी कार्डाच्या मागणीवर परिणाम होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मानणे आहे. यूएफएस कार्डात सामान्य कार्डापेक्षा पाच पट अधिक जलद गतीने फाईल ट्रन्सफर करण्याची क्षमता आहे. सध्या हे कार्ड ३२ जीबी, ६४ जाबी, १२८ जाबी आणि २५६ जाबी स्टोअरेजमध्ये उपलब्ध असून, ही मेमरी कार्ड्स DSLR, 3D VR कॅमेरा, अॅक्शन कॅमेरा आणि ड्रोन्स इत्यादी हाय रेझोल्युशन शुटिंग डिव्हाइसाठी निर्माण करण्यात आली आहेत. हे कार्ड ५३० एमबी प्रतिसेकंद डेटा रिड करत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जे सामान्य कार्डाच्या तुलनेत पाच पट जलद आहे. हे कार्ड ५ जीबीचा फूल एचडी चित्रपट केवळ १० सेकंदात रिड करू शकते. यासाठी सामान्य कार्डास ५० सेकंदाचा वेळ लागतो. सामान्य मायक्रोएसडी कार्डाची रिडिंग क्षमता ९५ एमबी प्रतिसेकंद असते. यूएफएस कार्डाच्या मागील बाजून एक विशिष्ट प्रकारचे पिन कनेक्शन असते, जे यास सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मायक्रोएसडी कार्डापेक्षा वेगळे ठरवते. हे कार्ड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरसाठी अधिक उपयुक्त ठरेल असे कंपनीचे मानणे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...