मुख्य सामग्रीवर वगळा

Guruji

शाळांना जर का शिक्षक
लाभला नसता

तर आयुष्याच्या गणिताचा
भूगोल झाला असता                 ॥ १ ॥

फळयावर जर खडूचा
हात फिरला नसता

तर....अ ब क ड ,बाराखडीचा
अर्थ कळला नसता.                   ॥ २ ॥

डोळे भरून येतात जेव्हा
हातात पगार येतो.

गुरूजी(सर) तुम्हीच आकार दिला,
जेव्हा मातीचा मी गोळा होतो.     ॥ ३ ॥

पायथागोरस, आर्किमिडिज,
 न्यूटनअजूनही तोंडपाठ
आहेत गुरूजी(सर).

तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या
 रेणुसूत्रातमला तुम्हीच
दिसता गुरूजी(सर).                          ॥ ४  ॥

तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यंत विसरलो नाही मी.

घोड़ी करुन उभे करायचात
तुम्ही आता तीच पद्धत
व्यायामाला वापरतो मी.             ॥ ५ ॥

शाळा चुकवायचो कित्तेकदा
उनाडक्या करतांना.

पण भीती वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना.                    ॥ ६ ॥

आज मात्र तुम्ही सोशल साईटवर
चेष्टेचा विषय झालात

मास्तर कोमात;  गुरूजी(सर) जोमात.
मास्तर पळाला;  यात्रेला गेला      ॥ ७ ॥

असल्या कमेंट्स
जेव्हा लोक करतात.
काळीज फाटतंय हो गुरूजी (सर)
आमचे आदर्श रोज मरतात .         ॥ ८ ॥

तुमची प्रतिमा मात्र माझ्या
हृदयातआदरणीयच राहील.

मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो.
ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥ 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...