मुख्य सामग्रीवर वगळा

शैक्षणिक बातम्या

*एससीईआरटी नव्हे; आता ‘विद्या प्राधिकरण’*
☄☄☄☄$☄☄☄☄
Maharashtra Times | Oct 25, 2016, 04.00 AM
🔹म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘राज्यभरातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी अन् महाराष्ट्राला प्रगत स्थितीला नेण्यासाठी राज्य सरकारने नवी रचना केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद अर्थात *एससीईआरटीची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याचे नामांतर विद्या प्राधिकरण असे करण्यात आले आहे.* या बदलाबरोबरच नाशिकमध्ये प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालय स्थापण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात गुणवत्तेचा स्तर उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे मिशनही यशस्वी करण्याचा या प्राधिकरणाचा उद्देश आहे. प्राधिकरणाच्या कोअर कमिटीमध्ये शिक्षण क्षेत्रातले २० तज्ज्ञ योगदान देतील. यांच्या नेमणुका राज्य सरकारच्या माध्यमातून होतील. या तज्ज्ञांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. नव्या रचनेतील *प्राधिकरणाचे मुख्यालय पुण्यात,* तर राज्यातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार आहे. राज्यभरात केवळ पाच शहरांमध्येच प्रादेशिक कार्यालय राहील. यात नाशिकचा समावेश आहे. *नाशिकसह नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि मुंबईत प्रादेशिक कार्यालय असेल.*विद्या प्राधिकरणाच्या कामात सर्व घटकांचा समावेश होऊन सुसूत्रता यावी, यासाठी प्राधिकरणातील सदस्यांसह जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षकांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक आदी अशासकीय सदस्यांचाही समावेश यात होईल.



*क्रीडा शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी*
☄☄☄☄$☄☄☄☄
Maharashtra Times | Oct 25, 2016, 03.16 AM 🔸म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील शाळांमधील क्रीडा शिक्षकांना लवकरच पदवीधर शिक्षकांसाठीची वेतनश्रेणी देण्याची कार्यवाही सुरू झाली असून लवकरच वेतनश्रेणी देण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सोमवारी दिले. या निर्णयामुळे पालिकेतील शेकडो क्रीडा शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर, २०१४ रोजी परिपत्रक निर्गमित करून प्रशिक्षित पदवीधरांना वेतनश्रेणी व वेतन निश्चितीबाबत निर्देश दिले आहेत परंतु या परिपत्रकात बी.पी.एड (क्रीडा शिक्षक) पदवीधारक शिक्षकांचा उलेख नसल्याने ते या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे या शिक्षकांना हे लाभ द्यावे यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली होती.

या बैठकीत पालकर यांनी वरील आश्वासन दिले आहेत. या बैठकीत शिक्षक आमदार रामनाथ मोते, अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.


*‘यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी घ्यावी’*
☄☄☄☄$☄☄☄☄
Maharashtra Times | Oct 25, 2016, 04.00 AM IST
🔹‘यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी घ्यावी’
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
🔸एमपीएससी परीक्षेच्या निकालातील विलंब ते रेंगाळलेल्या पदभरतीपर्यंत वेगवेगळ्या समस्यांशी सामना करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत यूपीएससीप्रमाणेच एमपीएससी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली.
स्पर्धा परीक्षेशी संबंधित प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षकपदाची २०१५-२०१६ साठी किमान एक हजार पदांची जाहिरात काढावी, वर्ग ३ व ४ च्या पदावरील सरकारी नोकरी भरतीवरील बंदी त्वरित उठवावी, २०१६ साठी विक्रीकर निरीक्षकपदाची जाहिरात काढावी, यूपीएससीप्रमाणे एमपीएससीची प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, परीक्षा शुल्क कमी करावे, परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावी आणि वेळेवर निकाल जाहीर करावेत, २०१६ साठी महाराष्ट्रातील पोलिस भरतीची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करावी, प्रत्येक वर्षी रिक्त जागा भरण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...