शिक्षणाची वारी २०१६ च्या निमित्ताने दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी बालेवाडी पुणे येथे जाण्याचा योग आला.सतत नव्याचा ध्यास असणारे माणचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांच्या प्रेरणेने माण मधील १९ नवोपक्रमशील शिक्षक व २३ ज्ञानरचनावादी शिक्षकांचा एक गट खास शिक्षणाची वारी बालेवाडी पुणे येथे भेट देण्यासाठी गेला होता.
माण व्हिजन या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
कार्यक्रमांतर्गत कुमठे बीटच्या
मा.प्रतिभा भराडे यांच्या प्रेरणेने ,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण ,शिक्षण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माण येथे
तालुक्यातील ५७ शिक्षकांची विशेष कार्यशाळा संपन्न झाली होती.यामध्ये सौ.उषा गोरे
व सौ.अफजल काझी या दोन शिक्षिकांनी कुमठे बीटामध्ये राबविलेल्या ज्ञानरचनावाद
अध्यापन पद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले.
माण
व्हिजन कार्यशाळेतील २३ शिक्षकांनी पुणे येथे शिक्षणाच्या वारीस प्रत्यक्ष भेट
देऊन तेथील ज्ञान घेवून त्याची महती व माहिती संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांना
प्रशिक्षित करावे अशा हेतूने पुण्यास पाठविले.
शिक्षणाच्या
वारीत विविध प्रकारचे एकूण ५२ शैक्षणिक माहितीचे उपक्रमाचे स्टाॅल लावले होते.
एरवी
ब्लॉग ,whatsapp,फेसबुक च्या माध्यमातून मिळणारी विविध माहिती देणारे अनेक ज्ञात
-अज्ञात तंत्रस्नेही धडपडे शिक्षक भेटले.
रवी
भापकर ,आनेमवाड,अतिवाडकर ही ऐकलेली नावाची हरहुन्नरी माणस
प्रत्यक्षात भेटली.प्रदीप डाकरे व जयदीप डाकरे या गुरुमाऊलींची तर साक्षात गळाभेट घडली.ज्यांच्या
ब्लोग्द्वारे व अॅपद्वारे आम्ही विविध संगीतमय पाढे,कविता ,लेझिम
पथक कवायत याविषयी माहिती आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना देतो त्या गुरुमाऊलींची
प्रत्यक्षात झालेली भेट अनमोल ठरली.
शिक्षणाच्या वारीच्या निमित्ताने ज्ञानरचानावादी
साहित्य निर्मितीची माहिती मिळाली.विविध घटक प्रत्यक्ष डोळ्याने पाहता आले विविध
शैक्षणिक साहित्य हाताळता आले .
संपूर्ण
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. गटसाधन
केंद्र कराड,हवेली विविध उपक्रमांची माहिती दिली.औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील
विद्यार्थ्यांनी अस्सखलितपणे इंग्रजीत संभाषण साधून संपूर्ण वारकऱ्यांचे लक्ष
केंद्रित केले.
साध्या
सोप्या टाकाऊ वस्तूंपासून ज्ञानरचनावाद कसा राबवावा याची माहिती मिळाली.आमचे मामा
श्री. संजयकुमार मोरे यांनी गटसाधन केंद्राच्या वतीने लावलेला ज्ञानरचानावाद महिती
देणारा स्टाॅल उपस्थितांना
मोजक्याच शब्दात महत्वाची माहिती देत होते.
आणेमवाड
सरांची व्हर्चुअल दुनिया दाखवणारी अॅप्स आम्हाला प्रत्यक्षात ताजमहालात घेवून
गेली.विविध अप्सच्या माध्यमातून मोबाइलवर चित्रातील निर्जीव पक्षी ,प्राणी सजीव करणारे आनेमवाड सर
जादुगारच वाटले.
बालभारतीने
लावलेल्या स्टाॅलमधून विविध पुस्तके खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही.
एकंदरीत
वारीतून आम्ही २३ जण ज्ञानामृत घेवून एक वेगळीच उर्जा घेवून बाहेर पडलो.
वारीच्या
यशस्वीतेसाठी मा. विस्ताराधिकारी संगीता गायकवाड ,केंद्रप्रमुख वीरकरसाहेब,रामजी सालगुडे यांनी विशेष श्रम घेतले.
श्री.सुरजकुमार निकाळजे ९७६३२५६७१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा