मुख्य सामग्रीवर वगळा

डंगिरेवाडीच्या बाल आनंद मेळाव्यात अबालवृद्धही नाचले



 

राणंद केंद्राच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा डंगिरेवाडी ता.माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी बालआनंद मेळावे आयोजित केले जातात.शासनाकडून त्याकरिता ७ हजार रुपये निधी उपलब्ध केला जातो.
यावर्षी राणंद केंद्रातील शाळांचा मेळावा  डंगिरेवाडी ता.माण येथील प्रसिद्ध महादेव मंदिराच्या सभामंडपात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केला जाणारा चालता बोलता या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्याबरोबरच परिसरातील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी बालचमूंनी केलेला नृत्याविष्कार पाहून गावातील नागरिक भारावून गेले होते.मुलांचे नेपथ्य व नृत्य सादरीकरण पाहून ग्रामीण भागातील शाळांतूनही चांगले कलाकार घडतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

 राणंदचे झींग झिंग झीगाट अन सातकी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या "डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला" या गाण्याच्या ठेक्यावर नाचण्यास गावातील अबालवृद्धदेखील स्वतःला रोखू शकले नाहीत.उपस्थित ,अधिकारी पदाधिकारी याचबरोबर महिलावर्गांनी देखील तालावर ठेका धरला.
प्रारंभी पवारवाडीच्या मुलांनी सादर केलेले संचलन पाहून  उपस्थितांना राजपथावरील संचालनाची आठवण झाली.तसेच लुप्त होत चाललेली लेझिम कला सादर करून जूनं ते सोनंची आठवण करून दिली.
केंद्रातील सोकासन ,शेवरी ,माळीवस्ती,कदमवस्ती,राणंद ,मुळीकवाडी ,पवारवाडी या शाळांनी जुन्या नव्या मराठी हिंदी गीतांवर नृत्य सादर केले. आपल्या गावात होणारा हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी दिवसभरच्या कामाला सुट्टी दिली.गावातील युवा वर्गांनी,महिलांनी ,तरुण,वृद्धांनी ज्याला जसे जमेल तशी मदत केली. उपस्थितांना केलेले जेवण वाढण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली मदत वाखाणण्याजोगी होती.
एका पायाने अपंग असलेले डंगिरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक युवराज जाधव यांनी यशस्वी व्यवस्थापन केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गावाने सहकार्य केले. नथुराम जाधव,सविता राऊत यांनी सूत्रसंचालन केले.केंद्रप्रमुख मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन संयोजकांचे कौतुक व आभार मानले.असा भव्यदिव्य कार्यक्रम डंगिरेवाडीसारख्या छोट्या गावात घेतल्याबाबत ग्रामस्थांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/द...