विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल वाटणे - आश्चर्य वाटणे ५)गंमत करणे - फजिती करणे. ६)खूश होणे - आनंदी होणे. ७) डोळ्यांसमोर नाचणे - एखादी गोष्ट सतत लक्षात येणे. ८)खोडी उलटणे - आपण केलेली खोडी आपल्याच अंगाशी येणे. ९) बिनधास्त राहणे - बेफिकीर , कसलीही काळजी न करता राहणे. *५) मला शिकायचंय* वाक्प्रचार १) गहिवरुन येणे - हृदय भावनेने भरुन येणे. २)डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू दाटणे. ३)कित्ता गिरवणे - दुसरे लोक वागतील तसेच वागणे. ४)स्वावलंबी बनणे - स्वत:चे कोणतेही काम स्वत:च करणे. ५)विचारमग्न होणे - विचारात गुंग होणे. विचारात रंगून जाणे. ६)निरुत्तर होणे - कोणतेही उत्तर न सुचणे, एखाद्याच्या प्रश्नांमुळे अबोल होणे. ७) पोटतिडकीने बोलणे - मनापासून, कळकळीने बोलणे. ८)रक्ताचे पाणी करणे ( रगतनं पाणी करसू ) - अतिशय कष्ट करणे, अतिश्रम करणे. ९)चेहरा आनंदाने फुलणे - खूप आनंद होणे. (खूप आनंद झाल्याने चेहरा आनंदी दिसणे.) १०)चिंतेत पडणे - काळजीत वाटत राहणे, खंत करणे. ११) अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. १२)धूम ठोकणे - पळून जाणे. १३) वैताग येणे - एखाद्या कामातील अडचणींमुळे खूप त्रास जाणवणे. १४)हैराण होणे - त्रासून जाणे. १५)दबा धरुन बसणे - टपून बसणे. ( शिकार करण्यासाठी लपून बसणे.) हल्ल्यासाठी तयार राहणे , आक्रमण करण्यासाठी योग्य संधी मिळण्याची वाट पाहत बसणे. *६) मायेची पाखर -* वाक्प्रचार १) आग्रह करणे - हट्ट धरणे, हेका धरणे. २)टाळाटाळ करणे - असंमती दर्शवणे, नकार देणे. एखादी गोष्ट करायची टाळणे. ३)आज्ञा करणे - आदेश देणे, हुकूम देणे. ४)पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे. ५)डोळा लागणे - झोप येणे. ६)रुचकर लागणे - चवदार, चविष्ट, स्वादिष्ट लागणे. ७)थंडीने कुडकुुडणे - खूप थंडी वाजणे. ८)पोटाशी धरणे - कुशीत घेणे, माया करणे. मायेने जवळ घेणे. ९)कडकडून भेटणे - प्रेमाने अलिंगन देणे. १०) मायेचा वर्षाव करणे - खूप प्रेम करणे. ११) झटत राहणे - सतत प्रयत्न करणे. १२) अजगरासारखे पडून राहणे - काहीही न करता शांतपणे पडून राहणे. १३) मांजरीच्या पायाचा असणे - एखादी गोष्ट करताना पायांचा आवाजही होऊ न देणे. (अशी सवय असणाऱ्या व्यक्तीस मांजरीच्या पायाचा आहे असे म्हणतात.) *७.धूळपेरणी* वाक्प्रचार १) जीव झुरणीला लागणे - काळजी लागून राहणे.हुरहुर लागणे. २)कासावीस होणे - व्याकूळ होणे. ३)आस लागणे - हूरहूर लागणे, इच्छा निर्माण होणे ४)बरकत होणे - भरभराट होणे, समृद्धी येणे. ५) पापणीला पूर येणे - डोळ्यांतून अश्रू येणे. ६)धुमारे फुटणे - वनस्पतींना / रोपांना नवीन पालवी येणे , कोवळी पाने येणे. *८. गुणग्राहक राजा...* वाक्प्रचार १)तिशी ओलांडणे - वयाची तीस वर्षे पूर्ण होणे... ( अशाप्रकारे विशी ओलांडणे, चाळीशी ओलांडणे, पन्नाशी ओलांडणे, साठी ओलांडणे, सत्तरी ओलांडणे, नव्वदी पार करणे..इ. वाक्प्रचारांचा उपयोग बोलताना केला जातो. २)फेरफटका मारणे - फिरायला जाणे. ३)पाठलाग करणे - मागे धावणे ४)देहभान विसरणे - स्वत: ची जाणीव विसरणे, गुंग होणे. ५)भानावर येणे - कल्पनाविश्वातून प्रत्यक्ष परिस्थितीच्या जाणीवेत येणे. ६)नजरेसमोर दिसणे - सतत लक्षात येणे. ७)वार्ता पसरणे - सगळीकडे बातमी समजणे. ८)उत्सुकता वाढणे - कुतूहल निर्माण होणे. ९)घामाघूम होणे - खूप घाम येणे. १०)पाठ थोपटणे - शाबासकी देणे. ११) पिळवणूक करणे - छळ करणे, शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या त्रास देणे, छळवणूक करणे. १२)प्रोत्साहन देणे - प्रेरणा देणे १३)परिवर्तन करणे - बदल करणे. १४)गौरव करणे - सन्मान करणे, सत्कार करणे, मानसन्मान देणे. १५) दंग होणे - गुंग होणे, मग्न होणे, हरपून जाणे. १६)दचकणे - घाबरणे. १७) बिलगणे - कवटाळणे *९) ईदगाह....* वाक्प्रचार १)आनंद उतू जाणे - खूप आनंद होणे २)नावाचा जप करणे ( चालणे ) - सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे. ३)बळी जाणे - मृत्यूमुखी पडणे ४)हृदयात कसंसंच होणे - मनात दु:खाची भावना येणे. ५)धुडकावून लावणे - स्पष्टपणे नकार देणे. ६)स्वत:वर ताबा ठेवणे - संयम बाळगणे, स्वनियंत्रण करणे. ७)गायब होणे - नाहीसे होणे. ८)मन लालचावणे - एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे, एखाद्या गोष्टीबद्दल मनात हाव, लालूच निर्माण होणे. ९)मन भरुन येणे - मनात भावना दाटून येणे. १०)पदर पसरणे - याचना करणे, दुवा मागणे,विनवणी करणे. *१०) धाडसी हाली -* वाक्प्रचार १) गौरव करणे - सन्मान करणे, सत्कार करणे, मानसन्मान देणे. २) वावर असणे - हिंडणे, फिरणे ३)खडान् खडा माहिती असणे - संपूर्ण माहिती असणे. ४)निकामी होणे - कोणत्याही कामाचा न राहणे. ५)मोलमजुरी करणे - कष्ट करणे, मेहनत करणे. कष्टाची कामे करुन पैसा मिळवणे. ६)संवर्धन करणे - काळजीपूर्वक जतन करणे, वाढवणे ७)झुंज देणे - लढा देणे, प्रतिकार करणे. ८)धाडस करणे - हिंमत दाखवणे, शौर्य गाजवणे ११) नाखवादादा,नाखवादादा... १) गाल फुगवणे - राग किंवा नाराजी प्रकट करणे. चेहऱ्यावर रुसवा दर्शवणे. १२) वाटाड्या वाक्प्रचार व त्यांचे अर्थ १)शिष्ट असणे - संकुचित वृत्तीचे असणे. एककल्ली स्वभावाचे असणे. स्वार्थी असणे. २)टिंगल करणे - एखाद्या व्यक्तीबद्दल समोर किंवा माघारी अपमानास्पद बोलणे . ३) जीव घाबरणे - मनात भीती वाटणे. ४) आवाजात आर्जव असणे - काकुळतीने विनंती करणे. ५)भानावर येणे - शुद्धीवर येणे, आजुबाजूच्या परिस्थितीची जाणीव होणे. ६) डोळे टिपणे - डोळ्यांतून आलेले अश्रू पुसणे. ७) निमूटपणे चालणे - काहीही न बोलता चालणे. ( निमूटपणे - गुपचूप ) ८) चाहूल लागणे - जाणीव होणे, कुणीतरी येण्याची जाणीव होणे. ९)कानठळ्या बसणे - बधीर होणे, दडे बसणे, कानाचे पडदे बंद होणे, थंडी, वारा किंवा मोठा आवाज यामुळे ऐकू न येणे. १०) छाती धडधडणे - खूप भीती वाटणे. ११) घसा कोरडा पडणे - भीतीमुळे घशाला कोरड पडणे. १२) डोळे पांढरे पडणे - खूप भीती वाटणे. १३) जीव मुठीत घेऊन बसणे - मनात खूप भीती बाळगून बसणे. १३)चवदार तळ्याचे पाणी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ १)आत्मभान जागे होणे - स्वत:बद्दलचा अभिमान जागृत होणे, स्वत्व निर्माण होणे. स्वत: बद्दलची जाणीव निर्माण होणे. २)नवशक्ती येणे - एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा, आत्मविश्वास निर्माण होणे. ३)प्रेरित करणे - प्रेरणा देणे. ४) मनाई असणे - बंदी असणे, प्रतिबंध असणे. ५) धिक्कार करणे - निषेध करणे, तीव्र शब्दांत विरोध करणे. ६) सत्याग्रह करणे - न्याय मिळवण्यासाठी सनदशीर मार्गाने, कोणत्याही प्रकारची हिंसा न करता लढा देणे. १४) मीठाचा शोध वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. १) आश्चर्य वाटणे - नवल वाटणे. २) कुतूहल जागृत होणे - उत्सुकता, एखादी गोष्ट जाणू घेण्याची इच्छा निर्माण होणे. ३)युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. १५) आनंदाचं झाड वाक्प्रचार व त्यांचे अर्थ १) पालवी फुटणे - रोपट्यांना नाजूक कोवळी पाने येणे. (एखाद्या कामाच्या सुरुवातीच्या अवस्थेला पालवी फुटली असेही म्हटले जाते. ) २) परोपकार करणे - दुसऱ्यांना निस्वार्थीपणे मदत, सहकार्य करणे. इतरांवर उपकार करणे. ३)जोपासणा करणे - जतन करणे, संवर्धन करणे, सांभाळ करणे. ४)रुंजी घालणे - भोवती फिरणे. ५)फन्ना उडवणे - खाऊन टाकणे. ६)पटाईत असणे - तरबेज असणे. ७)निगा राखणे - काळजी घेणे, जतन करणे, संवर्धन करणे, जोपासणा करणे. ८)मन मोहित करणे - मनाला भुरळ घालणे, मनास मोहून टाकणे. ९)साद घालणे - बोलावणे, हाक देणे, हाक मारणे. १०) अजबखाना - चित्रविचित्र गोष्टींचा संग्रह असलेले ठिकाण . १६. झुळुक मी व्हावे १) स्वैर - मोकळेपणा २)कानोसा घेणे - कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे. ३)पसार होणे - पळून जाणे , धूम ठोकणे. १८) जननायक बिरसा मुंडा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ १) परिस्थिती हालाखीची असणे - खूप गरिबी असणे. २)रस असणे - आवड असणे ३) असंतोष निर्माण होणे - नाराजी, खेद निर्माण होणे. ४)संकल्प करणे - एखादी गोष्ट करण्यासाठी निश्चय करणे. ५) जेरीस आणणे - त्रासून सोडणे, भंडावून टाकणे. ६)रवानगी करणे - पाठवणे ७) वीरगती प्राप्त होणे - वीरमरण येणे, शत्रूशी लढताना मृत्यू येणे. ८)बहाल करणे - अर्पण करणे, सन्मापूर्वक देणे
🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...
डोळे मिचकावणे
उत्तर द्याहटवाडोळा मारणे
उत्तर द्याहटवाPls tell me something
जीव खाणे
हटवा