मुख्य सामग्रीवर वगळा

अपंगत्वावर मात करणाऱ्या प्रेरणा दायी व्यक्ती

♿ आज 3 डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अपंगत्व तुमच्या मनात आहे, माझ्यात नाही, हे सांगणाऱ्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊ...
 
*1) हेलन केलर* : 
मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व व अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या त्यांच्यावर कोसळली. या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका व समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.

*2) लुईस ब्रेल* : 
वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.

*3) सुधा चंद्रन* : 
एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.

*4) ऑस्कर पिस्टोरियस* : 
पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित 110, 200 व 400 मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहे. 

*5) स्टीफन हॉकिंग* : 
या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा आजार झाल्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.

*6) बी.एस.चंद्रशेखर* : 
चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

*7) मन्सूर अली खान* : 
टायगर पतौडी यांनी कार अपघातात उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवत कप्तानपदाची धुरा सांभाळली. एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक असा लौकिकही मिळवला.

*8) अरुणिमा सिन्हा* : चोरट्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याने समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांच्या पायाचा लचका तोडला. तरीही त्यांनी जिद्दीच्या जोरावर ‘एव्हरेस्ट’ पार केले. त्यांच्या या कर्तृत्वाचा सत्कार म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ देण्यात आला. 

*9) जेसिका कॉक्स* : 
हात नसतानाही पायलटचा परवाना मिळवणारी ती जगातील पहिली महिला ठरली. ती तिच्या पायांनी विमान उडवते. 2008 मध्ये पायलट परवान्यासह तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

*10) दीपा मलिक* : 29 व्या वर्षी पॅरालेसिस झाल्यानंतरही स्पोर्ट्स डेस्क- रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिक गेम्समध्ये दीपा मलिकने थाळीफेकमध्ये सिल्वर मेडल जिंकले. हे मेडल जिंकणारी पहली भारतीय महिला पॅरा अॅथलीट ठरली. 

♿♿♿♿♿♿♿♿♿

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...