शनिवार दिनांक २७ ऑगस्ट २०१६ रोजी राणंद केंद्रातील
सर्व प्राथमिक ,माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची एक
दिवसीय शिक्षण परिषद पंडित नेहरू विद्यालयात संपन्न झाली.केंद्रप्रमुख मिलिंद
कांबळे ,जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे तज्ञ व्यक बाळासाहेब सूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रगत शैक्षणिक
महाराष्ट्र कार्यक्रमाविषयी सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
पंडितचे कलाशिक्षक प्रशांत रघुनाथ सुतार यांनी रंग व
रंगांचे प्रकार या विषयी माहिती दिली.तसेच कागदाचा मुकुट,थर्मोकोलचे सजावट साहित्य कसे बनवायचे याविषयी प्रात्यक्षिकासह
माहिती दिली.
आनंदराव देवकुळे यांनी जीवन शिक्षण अंकाचे वाचन
केले.श्री.सुरजकुमार निकाळजे यांनी ब्लॉग व सरल प्रणालीविषयी माहिती दिली.प्रशांत
काटकर यांनी शालार्थ वेतन प्रणालीविषयी मार्गदर्शन केले.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा