-: महात्मा जोतिबा फुले :-
( इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९० ) हे मराठी, भारतीय समाज सुधारक होते. बालपण त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोर्हे हे मूळ आडनाव होते. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी सावित्री बाईंना शिक्षित करून शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामां प्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिके तील कृष्ण वर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितां कडून होणार्या अन्याय, अत्याचारा पासून , गुलाम गिरीतून शूद्राति शूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
• इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
• इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
• इ.स. १८४० - सावित्री बाईंशी विवाह.
• इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
• इ.स. १८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
• इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
• इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाह प्रसंगी मिरवणु कीत उच्च वर्णीयांकडून अपमान झाला.
• इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
• सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - चिपळूण करांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
• इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
• मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
• नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
• इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
• इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
• इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
• इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
• इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
• इ.स. १८६० - विधवा विवाहास साहाय्य केले.
• इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
• इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपना विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
• इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
• इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
• इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
• इ.स. १८७५ - शेतकर्यांच्या शोषणा विरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले (अहमद नगर).
• इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतीं ची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
• इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
• इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
• इ.स. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसि एशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
• इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
• इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्ट कांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिता शिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
• इ.स. १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
• इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने राव बहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
• २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
# प्रकाशित साहित्य :-
• इ.स. १८५५ - तृतीय रत्न (नाटक)
• इ.स. १८६९ - पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा (पोवाडा)
• इ.स. १८६९ - ब्राह्मणांचे कसब (लेखसंग्रह)
• इ.स. १८७३ - गुलामगिरी (लेखसंग्रह)
• इ.स. १८९३ - शेतकऱ्यांचा असूड (लेखसंग्रह)
• इ.स. १८८५ - सत्सार (नियत कालिक)
• इ.स. १८८५ - इशारा (लेखसंग्रह)
• इ.स. १८८९ - सार्वजनिक सत्यधर्म (लेखसंग्रह)
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचने ची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिता शिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळा तील समाजा पर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा