बुद्ध कुणावर प्रेम करत नाही, बुद्ध कुणाचा तिरस्कारही करत नाही पण त्याच्या मनात प्रत्येकाबद्दल अपार 'करुणा' असते.
बुद्ध कुणाची वाहवा करत नाही, बुध्द कुणाचा अपमानही करत नाही पण तो तठस्थपणे चिकित्सा मात्र करतो.
बुद्ध आशीर्वाद देत नाही, बुद्ध शाप आणि उ:शापही देत नाही पण तो तुम्हाला 'माणूस' म्हणून कसं जगावं हे सांगणारा पथदर्शक मात्र होतो.
बुद्ध मानला तर भिक्षा मागून जगणारा एक भिक्खु आहे आणि जाणला तर स्वत:मध्ये एक प्रचंड विद्वत्ता आहे, अद्वितीय तत्वज्ञान आहे.
बुध्द अल्प नाही, बुद्ध अती ही नाही.
या कमी आणि जास्तच्या मधल्या पुलावरून तो सहज चालणारा आहे.
या कमी आणि जास्तच्या मधल्या पुलावरून तो सहज चालणारा आहे.
बुद्ध कधी सूक्ष्म अणु आहे आणि जवळ गेल्यावर अवकाशासारखा आहे...ज्याचा थांग आपल्याला लागत नाही.
बुद्ध मानला तर धम्माचा संस्थापक आहे, श्रमण आहे, तथागत सम्यक संबुद्ध आहे त्याचवेळी बालपण, तारुण्य, वृद्धावस्था, आजारपण आणि मृत्यू या सगळ्या मानवी अवस्थांतून गेलेला तूमच्या-माझ्यासारखा 'मानव' सुद्धा आहे..बुद्ध शाश्वत सत्य आहे आणि इतक्या आघातानंतर सुद्धा न संपणारी अभेद्य विचारधारा आहे.
बुद्ध एका जागी एक महामानव आहे आणि दुसऱ्या जागी तो तुमचंच 'मन' आहे.
एकदा स्वत:ला विचारा यात तुमचा आणि तुम्हाला समजलेला 'बुद्ध' कुठे बसतो??
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा