http://crcranand.blogspot.in
हा सातारा जिल्हा परिषद अंतर्गत माण पंचायत समिती शिक्षण विभागातील राणंद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सातकी या शाळेतील तंत्रास्नेही शिक्षक श्री .सुरजकुमार चंद्रकांत निकाळजे यांनी तयार केलेला शैक्षणिक ब्लॉग असून त्याद्वारे शैक्षणिक,सामाजिक माहितीची देवाणघेवाण केली जात आहे.
शैक्षणिक ब्लॉग तयार करण्याकामी पंचायत समिती माणचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.लक्ष्मणराव पिसे साहेब,विस्तार अधिकारी श्रीमती संगीता गायकवाड,केंद्रप्रमुख मा.श्री.मिलिंद कांबळे साहेब,तसेच तंत्रस्नेही चळवळीचे आद्यपुरुष मा.श्री.रामजी सालगुडे,मा.श्री.बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य व प्रेरणा दिली
हा ब्लॉग सेवेत देताना विशेष आनंद होत आहे.कारण याद्वारे प्राथमिक शिक्षणाच्या दिशा विस्तारणार असून माण सारख्या दुष्काळी भागातील प्राथमिक शाळांची माहिती देश विदेशात पोहचण्याचा नवा मार्ग निर्माण होणार आहे.तसेच विविध प्रकारची नवी माहिती माझ्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींना मिळण्याचा सोपा मार्ग दिसणार आहे.
हा ब्लॉग मी माझ्या सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना,माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करतो.

very good
उत्तर द्याहटवा-shirkule sir
Swaraj Acadmany Dahiwadi
very good
उत्तर द्याहटवा-shirkule sir
Swaraj Acadmany Dahiwadi