[26/08 7:41 AM] Suraj Tupe: ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. शिक्षण व जीवन यांचा परस्परसंबंध आहे; ज्ञानाकरिता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे, तसेच शक्य तेथे व्यवहारातही त्याच उपयोग करता आला पाहिजे, हेही युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन आणि कौशल्यांची प्राप्ती यांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच अनेक दृष्टीकोन व मूल्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञानसंक्रमण नसून विद्यार्थांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीची विकास करणारे, त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणारे, त्यांना चांगल्या सवयी लावणारे, त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास करणारे, त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना आणि त्यांच्या सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास करणारे अध्यापकाचे कार्य, म्हणजे अध्यापन होय.
संदर्भ : 1. Barnard, H. C. An Introduction to Teaching, London, 1965.
2. Brembeck, C. S. The Discovery of Teaching, Englewood Cliffs, 1962.
3. Gragia, Alfred de; Sohn, D. A. Ed. Revolution in Teaching, New York, 1964.
4. Mursell, J. L. Successful Teaching, Tokyo, 1964.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा