®rahul @thare
*मुलांचाअभ्यास कसा घ्याल??*📚📝🖍✏🖊📖📖
मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबन ,सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणाचे केंद्र आहे व अभ्यासक्रम हे संस्कृतीसंवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल.
शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या असतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एकदा का मूल शाळेत गेले म्हणजे शाळेत त्याला शिक्षकाचे ऐकावे लागते. दुसऱ्याचे हुकूम पाळणे मुलाला भाग पडते, मूल गांगरून जाते. म्हणून आरंभी घर व शाळा हा दुवा जितक्या उत्कृष्ट तऱ्हेने सांधला जाईल तितका शिक्षणाचा पाया नकळत दृढ होत जाईल. म्हणूनच ही खबरदारी घेणारा शिक्षक मुलाचा खरा विकास साधू शकेल
मानसशास्त्रीय प्रगत शिक्षणपद्धती
बालमनाचे अवगाहन करून निरोगी वातावरणात पालकांचा सर्वांगीण विकास साधणे ही मानसशास्त्रीय दृष्टी समाजाला फार उशिरा आली. मानसशास्त्रदृष्ट्या जुन्याकाळी शिक्षणाकडे पाहिले जात नसे. मूल हे मोठ्या माण्सापेक्षा वेगळे आहे ही कल्पना काही वर्षापूर्वी नव्हती. प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ रुसो या फ्रेंच विद्वानाने ही कल्पना सर्व जगापुढे मांडली. त्याने मुलांचा अभ्यास तयार होतो. ही नैसर्गिक पद्धत प्रथम लोकांपुढे मांडली. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध विद्वान पेस्टालॉजी व त्याचा शिष्य फ्रोबेल यांनी या द्रुष्टीने विचार करून ‘किंडन गार्डन’ पद्धत सुरू केली. मुलाचा विकास निव्वळ माहिती देण्याने होत नाही. तर त्याला अनुभव यायला पाहिजे ही गोष्ट या शिक्षणशास्त्रज्ञाने जगाला पटवून दिली शिक्षण पद्धतीत शिक्षकाचे महत्त्व कमी झाले व मुलांचे महत्त्व वाढत गेले. हा पहिला मोठा फरक पडला. मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास होणे हे या शिक्षण विषयक कल्पनेचे परिणत स्वरूप होय.
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले शिक्षणाविषयक विचार चिंतनीय आहेत. शिक्षण म्हणजे ज्ञान देणे अगर माहितीचा प्रसार करणे नव्हे तर मानवाच्या अंतःकरणात खोलवर दडलेल्या एका आत्मीक शक्तीवर पोहचण्याचे सामर्थ्य मानवाला प्राप्त होण्याप्रत त्याला आंतरमनाचा विचार करण्यास प्रवृत्त करणे, त्यामधून जो मनुष्य तयार होतो तो पूर्णत्वाला पोचलेला असतो, देवत्व प्राप्त झालेले असणे. प्लेटो या थोर महात्म्याने सांगितले आहे की शरीराचा विकास व्हावयास पाहिजे तर शरीराच्या निरनिराळ्य़ा अवयवास काम मिळाले पाहिजे.ही शिक्षणाची दृष्टी महात्मा गांधीच्या शिक्षणपद्ध्तीत उघड दिसून येते. निसर्ग, समाज व उद्योग ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्यांच्या मधील ज्ञान केवळ, पुस्तकांच्या साहाय्याने न देता ते पक्के होते. ही गोष्ट विचारवंताना पटलेले आहे. त्यातही मुलाला मोठं महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.
प्रगत शिक्षणाचा विचार करता असे दिसून येईल की, नाट्य, काव्य, नृत्य, निसर्गदर्शन, खेळ, छंद इत्यादींनी मुलाभोवती मोकळे वातावरण निर्माण होते; व मुलांचा सर्वांगीण विकास होतो. वरील गोष्टी तात्त्विक दृष्टीने मांडलेल्या दिसतील पण सद्यःपरिस्थितीत अभ्यासक्रम, पुस्तके, शालेय शिस्त परीक्षा परीक्षेतील गुण यावर भावी जीवनाकडे दृष्टी ठेवून पालक शिक्षक मुलांचा अभ्यास पुरा करून घेणे त्यांच्या व्यवहारी जीवनाकडे दृष्टी ठेवणे, अशा अनेक समस्या समाजापुढे आहेत; त्याकरिता सरकारी यंत्रणेने शाळा शिक्षक शिक्षणपद्धती, परीक्षा पद्धती वगैरे बाबतीत केलेले नियम आणि वर निर्देशित केलेली पालकांच्या विकासाची दृष्टी यांचा मेळ घालताना मुलांचा विचार, मुलांचे समाधान मुलांची प्रगती मुलांची जिद्द, समाजात माणूस म्हणून त्याचा जगण्याचा हक्क दुसऱ्याच्या हितात आनंद मानण्याची वृत्ती त्याच्या अंगी बाणणे म्हणजेच खरा माणूस होणे.या दृष्टीने आज शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन पाहिजे. शिक्षक शाळेत तासन्तास शिकवतो. पालकांचा मुलागागे अभ्यासाचा तगादा या गोष्टींनी नकळत मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तीकडे दुर्लक्ष होण्याचा केव्हा केव्हा धोका निर्माण होतो.
*आपला मित्र*
_*राहुल आठरे .नेवासे ,जि. अ'नगर.*_
_*जि.प प्रा शाळा वीर नं 3 ता, चिपळूण जि. रत्नागिरी*_
📞*7588602550*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा