*महाराष्ट्र : प्राकृतिक विभाग*
महाराष्ट्राचे प्रमुख ३ प्राकृतिक विभाग आहेत :
१. कोकण किनारपट्टी
२. पश्चिम घाट
३. दख्खनचे पठार
१. कोकण किनारपट्टी :- -
विस्तार : महाराष्ट्राचा अति-पश्चिम भाग म्हणजे कोकण
उत्तरेकडे उल्हास नदी ते दक्षिणेकडे रेडी-बांद्यापर्यंत कोकण पसरला आहे.
लांबी – सुमारे ७०० किमी
सह्याद्री आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे कोकण.
कोकणाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत गेलेली आहे.
उत्तर कोकण बेसाल्ट खडकापासून तर दक्षिण कोकण जांभा खडकापासून बनलाय. (कारण – द. कोकणात पडणारा मुसळधार पाऊस!)
नद्या :- -
येथील नद्या अरुंद आहेत. तसेच अति-तीव्र उतारामुळे जलद धावतात.
त्या सह्याद्रीवर उगम पावतात आणि अरबी समुद्रास जाऊन मिळतात.
त्यामुळेच या नद्यांनी प्रचंड प्रमाणात खननकार्य केले आहे.
नावे – उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री इ.
खाड्या :- -
भरती आल्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी उलट्या मार्गाने नदीच्या मुखात शिरते. जिथपर्यंत हे पाणी शिरते त्या भागाला खाडी असे म्हणतात.
कोकणातील खाड्या – तेरेखोल, विजयदुर्ग, राजापूर, जयगड, दाभोळ, धरमतर, ठाणे, वसई, इ.
२. पश्चिम घाट :- -
कोकणच्या शेजारचा डोंगराळ प्रदेश म्हणजे पश्चिम घाट होय.
पश्चिम घाटालाच सह्याद्री डोंगररांगा म्हंटले जाते.
सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे.
उंची – ९०० ते १२०० मीटर
सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे. कारण त्याने नद्यांचे दोन प्रमुख गट पडले आहेत – अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या!
सह्याद्रीच्या प्रमुख ३ डोंगररांगा :- -
१. सातमाळा अजिंठा डोंगररांगा
२. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा
३. महादेव डोंगररांगा
१. सातमाळा अजिंठा डोंगररांगा :- -
सातमाळा डोंगररांगा नाशिक जिल्ह्यात आढळतात.
अजिंठा आपल्याला औरंगाबादमध्ये दिसतात.
या रांगांच्या उत्तरेकडे तापी नदी तर दक्षिणेकडे गोदावरी नदी आहे.
२. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा :- -
अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत.
गोदावरी आणि भीमेला वेगळे करण्याचे काम यांनी केले आहे.
३. महादेव डोंगररांगा :- -
ह्या रांगा पाहण्यासाठी आपल्याला सातारा आणि सांगलीला जावे लागेल.
यांनी भीमा आणि कृष्णेला वेगळे केले आहे.
थोडक्यात ...क्रम लक्षात ठेवा :- -
(उत्तरेकडून दक्षिणेकडे)
तापी
१. सातमाळा अजिंठा डोंगररांगा
गोदावरी
२. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा
भीमा
३. महादेव डोंगररांगा
कृष्णा
सातपुडा रांगा :- -
सातपुडा या पूर्व-पश्चिम विस्तार असेलल्या रांगा आहेत.
नर्मदा आणि तापी यांना अलग करणारा कोण – सातपुडा पर्वत !!
या सातपुडा रांगांचा फारच थोडा भाग महाराष्ट्रात येतो.
नंदुरबार आणि अमरावती या दोनच जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांग आहे.
नंदुरबारमध्ये या रांगा ‘तोरणमाळ पठार’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
तर इकडे अमरावतीमध्ये ‘गाविलगड टेकड्या’ नावाने !!
सह्याद्री विशेष :- -
घाट : थळ, बोर, कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली इ.
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सह्याद्री पर्वतरांगांत आहे. – कळसुबाई
कळसुबाई – उंची १६४६ मीटर (जिल्हा – अहमदनगर; विस्तार - अहमदनगर व नाशिक जिल्ह्यादरम्यान)
दख्खन पठार (महाराष्ट्र पठार) :- -
स्थान : पश्चीम घाटाच्या पूर्वेस
निर्मिती : बेसाल्ट या अग्निज खडकापासून
महाराष्ट्राचा ९०% भाग याच पठाराने व्याप्त आहे. म्हणजेच महाराष्ट्र प्रामुख्याने बेसाल्ट खडकाने बनलेला आहे.
पठारे यादी : अहमदनगर पठार, सासवड पठार, बुलढाणा-मालेगाव पठार, तोरणमाळ पठार इ.
पठारावरील नद्या : गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा, वर्धा, वैन
विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा