४) व्यंजन
* व्यंजन :-
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
१] मराठी वर्णमालेतील 'क, ख... पासून ह, ळ' पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत.
२] व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.
३] आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात 'अ' हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.
४] उदा :- क् + अ = क
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा