संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी :-
जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात.
(स्वर + वर)
उदा.
सूर्य+अस्त =सूर्यास्त
२) व्यंजनसंधी :-
एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.
(व्यंजन + स्वर किंवा व्यंजन).
उदा.
विपद्+काल = विपत्काल
३) विसर्गसंधी :-
एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.
(विसर्ग + स्वर किंवा व्यंजन)
उदा.
मनः +रथ = मनोरथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा