मुख्य सामग्रीवर वगळा

चला मराठी शिकुयात भाग 8 सामान्य नाम

सामान्यनाम :-
ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा  किवा प्राण्याचा  किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

१) दर्शना हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) ठाणे प्रसिद्ध शहर आहे.

वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो.
आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे 'मुलगी, नदी, शहर' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.

*सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.
अ) पदार्थ वाचक नाम :-
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.
उदा.
तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.

ब) समुह वाचक नाम :-
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.
उदा.
मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...