मुख्य सामग्रीवर वगळा

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचार करता.   

आणि शेवटी अती महत्वाचे 

*प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं आत्मिक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.* 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...