मुख्य सामग्रीवर वगळा

संकलित चाचणी 2

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०२५*
*दिनांक* : *१४/०४/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________
*संकलीत चाचणी-२ मधील विध्यार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद student पोर्टल मध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना*  __________________________________________

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील संकलीत चाचणी क्रमांक २ ही नुकतीच झालेली आहे.या *संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये नोंद करण्याची सुविधा शासनाने आजपासून म्हणजेच दिनांक १४/०४/२०१७ पासून उपलब्ध करून दिलेली  आहे.तरी सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की,दिनांक ३०/०४/२०१७ पर्यंत सर्व शाळांनी संकलीत चाचणीचे गुण student पोर्टल मध्ये त्वरीत भरून घ्यावे.शैक्षणिक वर्ष अखेर व वरिष्ठ कार्यालयाद्वारे विद्यार्थी प्रगती मूल्यमापन यावर अभ्यास करण्याच्या दृष्टिने संकलीत चाचणी २ चे गुण भरण्यासाठी दिलेल्या दिनांक ३०/०४/२०१७ या अंतिम मुदत नंतर कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिला जाणार नाही अशा सुचना देण्यात आलेल्या आहे.संकलित चाचणी 2 ची माहिती भरताना खालील काही बाबी लक्षात घ्याव्यात.*

१) *ज्या शाळांनी पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी-१ या परीक्षांचे गुण student पोर्टल मध्ये अद्याप भरलेले नाही आहे अशा शाळाना जोपर्यंत हे गुण student पोर्टल मध्ये भरत नाही तो पर्यंत त्यांना संकलीत चाचणी-२ चे गुण नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.*

२) *संकलीत चाचणी-२ चे गुण नोंद करण्यासाठी student पोर्टल मधून त्या त्या वर्गाची  Excel sheet Download करून घ्यावी व माहिती भरून पुन्हा upload करावी.*

३) ज्या शाळांनी या आधीच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी -१ च्या गुणांच्या नोंदी student पोर्टल मध्ये केलेल्या आहेत अशा शाळांनी या वेळी फक्त संकलीत चाचणी-२ च्याच गुणांची नोंद करावयाची आहे. *संकलित चाचणी-२ च्या गुणांची नोंद करताना  पायाभूत चाचणीचे गुण upload करावयाचे नाही आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे कमी वेळात हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.*

४)संकलीत चाचणी-२ चे  प्रत्येक शाळेचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही वेगाने व्हावी यासाठी *वरिष्ठ लेवलच्या सर्व Login ला पूर्ण व अपूर्ण शाळेचा report उपलब्ध करून दिलेला आहे.तरी सर्व वरिष्ठ Login आपल्या कार्यक्षेत्रातील काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने रोजचा अपडेटेड रिपोर्ट चेक करून त्वरीत नियोजन करू शकणार आहेत.*

५)शाळांना पुढील महिन्यात *उन्हाळी सुट्टी  लागणार असल्याने दिलेल्या अंतिम मुदतीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे* हे लक्षात घ्यावे.या अंतिम मुदतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नाही.

संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कशा पद्धतीने भरावे हे समजून घेण्यासाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगला भेट द्या.या ब्लॉग मधील *student Portal* या Tab मधील *Summative-२* या Tab ला क्लिक करा.या मध्ये आपणास संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कसे भरावे व संकलीत चाचणी-१ व २ चे गुण भरताना कोणकोणते बदल झालेले आहे हे सविस्तर समजून सांगण्यात आलेले आहे.आपण ही माहिती समजावून घेऊनच संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल ला भरावे.

तसेच संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कसे भरावे या बाबतचे Manual आपणास Download करावयाचे असेल तर आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगमध्ये *student portal* या Tab मधील शेवटच्या *Download Manual* या tab ला क्लिक करा व Manual Download करून घ्या

                              *किंवा*

Manual Download करण्यासाठी  पुढील लिंक ला क्लिक करा.

लिंक : http://pradeepbhosale.blogspot.in/p/student-portal-manual.html

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*

                         goo.gl/j9nFGk

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...