मुख्य सामग्रीवर वगळा

चला मराठी शिकुयात सर्वनामाचे उपप्रकार

२) पुरुषवाचक सर्वनाम

१) पुरुषवाचक सर्वनाम :-

बोलणाऱ्याच्या किंवा लिहणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच पुरुष म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
३) पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार

अ) प्रथम पुरुष :- मी, आम्ही, आपण, स्वत: इ.
उदा.
मी मुंबईला जाणार.
आपण मुंबईला जावू.

आ) द्वितीय पुरुष :- तो, तुम्ही, आपण, स्वत: इ.
उदा.
तुम्ही कुठून आलात ?
तो का नाही आला ?

इ) तृतीय पुरुष :- तो, ती, त्या, ते, आपण, स्वत: इ.
उदा.
त्याने मला बोलावले आणि स्वत: मात्र आला नाही.
ते सर्वजण तिकडे होते.
४) दर्शक सर्वनाम

२) दर्शक सर्वनाम :-
दर्शक म्हणजे दाखवणारे. कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
हा, ही, ते, हे, तो, ती,

उदा.
१) ही माझी बहिण आहे.
२) हा तिचा भाऊ आहे.

५) संबंधी सर्वनाम

३) संबंधी सर्वनाम :-
वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
जो, जे, ज्या, जी.
उदा.
१) जो अभ्यास करतो तो पास होतो.
६) प्रश्नार्थक सर्वनाम

४) प्रश्नार्थक सर्वनाम :-
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

उदा.
१) काय हो ही महागाई !
७) सामान्य / अनिश्चित सर्वनाम

५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम :-
वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे सांगता आले नाही की त्याला सामान्य / अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
उदा.
१) कोणी कोणास हसू नये

६) आत्मवाचक सर्वनाम :-
स्वत:विषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा.
१) तो आपण होवून माझ्याकडे आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/द...