एकदा एका उंदराने हिरा गिळला हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता
शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.
हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले?
शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!
आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो जगलो मोठे झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..!
विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा