माणूस म्हणून जगण्याचा मुलभूत अधिकार म्हणजे मानवी हक्क होय. समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा घटनेने अधिकार दिला असून त्यादृष्टीने नागरिकांच्या हक्काचे रक्षण व्हावे या हेतूने प्रत्येक वर्षी *10 डिसेंबर* रोजी जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो. जगभरात 1948 पासून दरवर्षी 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. जगातील बहुतेक राष्ट्रांनी मानव हक्काविषयी गंभीरतेने पावलं उचलली असून भारतात 1993 ला मानवी हक्क संरक्षण कायदा केला गेला. त्यानुसार सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठीचे हक्क प्राप्त झाले. मानवी हक्क म्हणजे मानवाला माणूस म्हणून जन्माला आला तेव्हापासून स्वातंत्र्याचा, समतेचा आणी जगण्याचा हक्क प्राप्त झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या 42व्या कलमात मानवी हक्कांचे अधिकार दिलेले आहेत. त्यांनी हे कलम म्हणजे भारतीय घटनेचा आत्मा आहे असे म्हटले आहे.
मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.
जीवनाधिकार (Right to life)
यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
कोर्ट सुनवाईचा अधिकार (Right to a fair trial)
भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा