рдоुрдЦ्рдп рд╕ाрдордЧ्рд░ीрд╡рд░ рд╡рдЧрд│ा

ЁЯСЙ _*рдирд╡ीрди рдкेрдирдб्рд░ाрдЗрд╡्рд╣ рдШेрддाрдиा рдХाрдп рдкाрд╣ाрд▓ ?

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पेनड्राइव्ह हा महत्वाचा दुवा आहे. किमान सत्तर टक्के लोक हे डेटा साठविण्यासाठी पेन ड्राइव्ह किंवा फ्लॅश ड्राइव्हचा उपयोग करतात. पेनड्राइव्ह डेटा ठेवण्यासाठी लागतो म्ह्णून आपण तो खरेदी करतो. मात्र वरवरचा सुंदर दिसणारा पेनड्राइव्ह खरंच तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो का? तुम्ही खरेदी केलेला पेनड्राइव्ह वापरण्या योग्य असतो का? म्हणूनच चांगल्या पेनड्राइव्हसाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याविषयी जाणून घेऊयात. 👉 _*पेनड्राइव्हचे दोन प्रकार*_ पेनड्राइव्ह 3.0 आणि 2.0 या दोन प्रकारामध्ये असतो. 3.0 हा प्रकार 2.0 पेक्षा तुलनेने अधिक वेगवान मानला जाते. 3.0 चा डेटा कॉपी करण्याचा वेग प्रति सेकंद 100 मेगाबाइट इतका आहे. तर, पेनड्राइव्हच्या 2.0 या प्रकारचा वेग प्रति सेकंद 10 ते 15 मेगाबाइट इतका आहे. त्यामुळे 3.0 या प्रकारचा पेनड्राइव्ह खरेदी करा. 👉 _*पेनड्राइव्हच्या आकारावर लक्ष द्या*_ आकारावरही पेनड्राइव्हची कामगिरी अवलंबून असते. त्यामुळे पेनड्राइव्ह खरेदी करताना त्याच्या आकारावरही लक्ष देणे गरजेचे असते. खरे पाहता, पेनड्राइव्हचा आकार जितका मोठा असेल, तितका त्याचा दर्जा आणि कामगिरी चांगली असते असे मानले जाते. पेनड्राइव्ह जितका वजनाने अधिक तितक्या चांगल्या वस्तूंचा त्याच्या निर्मितीसाठी वापर केला गेला आहे, असे मानले जाते. 👉 _*पेनड्राइव्ह वेगवान हवा*_ पेनड्राइव्ह खरेदी करताना काही पेनड्राइव्ह 1000 रुपयांपर्यंत असतात तर, काही पेनड्राइव्हची किंमत पाचशे रुपयेही असल्याचे आढळते. साठवण क्षमता सारखी असूनही त्यांची किंमत वेगवेगळी असण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा वेगवेगळा असणारा वेग होय. म्हणून चांगल्या पेनड्राइव्हसाठी केवळ साठवण क्षमताच नाही तर त्या पेनड्राइव्हचा वेगही लक्षात घेणे गरजेचे आहे. 👉 _*पासवर्ड सुरक्षित पेनड्राइव्ह*_ सध्या बाजारात पासवर्डद्वारे सुरक्षित पेनड्राव्ह उपलब्ध झाले आहेत. ज्या व्यक्ती पेनड्राइव्हच्या सुरक्षिततेविषयी संवेदनशील आहेत, ज्यांना आपला डेटा कायम सुरक्षित रहावा, असे वाटत असेल त्यांच्यासाठी हे पेनड्राइव्ह अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून पेनड्राइव्हमधील संवेदनशील डेटा पासवर्डच्या मदतीने सुरक्षित ठेवता येऊ शकतो. 👉 _*किंमत नाही, दर्जा पहा*_ बाजारात एकाच ब्रँडचे दोन पेनड्राइव्ह वेगवेगळ्या किंमतीला असल्याचे आढळून येते, त्या वेळी बराच गोंधळ उडतो. त्यातील एकाची किंमत कमी, तर दुसऱ्याची जास्त असल्याचे लक्षात येते. तुम्ही जास्त किंमत असलेला पेनड्राइव्ह घेऊ शकत असाल, तर तोच खरेदी करा. कारण, तो पेनड्राइव्ह तुम्हाला केवळ कमाल वेगच देत नाही तर, त्या शिवाय अन्य वैशिष्ट्यांचाही फायदा करून देतो. पेनड्राइव्हचा उपयोग काही विशिष्ट कारणासाठी करायचा असेल, तर शक्यतो पेनड्राइव्ह घेताना तडजोड करू नका

рдЯिрдк्рдкрдг्рдпा

рдпा рдм्рд▓ॉрдЧрд╡рд░ीрд▓ рд▓ोрдХрдк्рд░िрдп рдкोрд╕्рдЯ

рд╡ाрдХ्рдк्рд░рдЪाрд░ рдЗрдпрдд्рддा рдЪौрдеी

рд╡िрд╖рдп : рдорд░ाрдаी ( рдмाрд▓рднाрд░рддी) рд╡ाрдХ्рдк्рд░рдЪाрд░ рд╕ंрдЧ्рд░рд╣ *реи.рдмोрд▓рдгाрд░ी рдирджी* рез) рдпुрдХ्рддी рд╕ुрдЪрдгे - рдХрд▓्рдкрдиा рд╕ुрдЪрдгे. реи)рдкрд░рд╡ाрдирдЧी рдоिрд│рдгे - рд╕ंрдорддी рдоिрд│рдгे, рд╕рд╡рд▓рдд рдоिрд│рдгे, рдоोрдХрд│ीрдХ рдоिрд│рдгे. рей)рд╢ाрд│ा рдмुрдбрд╡рдгे - рд╢ाрд│ेрд▓ा рди рдЬाрдгे. рек)рдирд╡рд▓...

♿♿ *рдЕрдкंрдЧ (рджिрд╡्рдпांрдЧ) рд╡्рдпрдХ्рддि рдЕрдзिрдХाрд░ рдХाрдпрджा - реирежрезрем* ♿

🙏🏻🙏🏻 *рдХाрд╣ी рдорд╣рдд्рд╡ाрдЪी рдХрд▓рдоे...!* 🙏🏻🙏🏻 *# рдХрд▓рдо рей (рез)* рджिрд╡्рдпांрдЧ рд╡्рдпрдХ्рддींрдиा рд╕рдоाрдирддा, рд╕рди्рдоाрди, рдЖрджрд░, рд╕рдЪोрдЯी рд╡िрд╖рдпी рд╣рдХ्рдХ рдЗрддрд░ांрдк्рд░рдоाрдгे рдмрдЬाрд╡рддा рдпेрдИрд▓. рд╣ि рд╕ुрдпोрдЧ्рдп рд╢ाрд╕рдиाрдЪी рдЬрдмाрдмрджाрд░ी рдЕрд╕ेрд▓. *# рдХрд▓рдо рек (рез)* рдж...

рдХ्рд░ांрддिрд╕िंрд╣ рдиाрдиा рдкाрдЯीрд▓

рдХ्рд░ांрддिрд╕िंрд╣ рдиाрдиा рдкाрдЯीрд▓ рд╕्рдоृрддिрджिрди рд╡िрд╢ेрд╖- (рем рдбिрд╕ेंрдмрд░ реирежрезрен) рд╕ाрдоाрди्рдпрддः рд╕рд░्рд╡ рд╕рдоाрдЬ рдЕрдЧрд░ рдоाрдгрд╕े рдХाрд▓рдк्рд░рд╡ाрд╣ाрдк्рд░рдоाрдгे рд╡ाрд╣рдд рдЬाрдг्рдпाрдд рдзрди्рдпрддा рдоाрдирддाрдд рдЖрдгि рдпाрддрдЪ рдЖрдкрд▓ा рдоोрдаेрдкрдгा рд╕िрдж्рдз рдХрд░рдг्...