मुख्य सामग्रीवर वगळा

म मराठीचा


* स्वर :-
१] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.
२] या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात.
३] स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
४] स्वर म्हणजे नुसता सुर.

* स्वरांचे प्रकार-
अ] उच्चारावरून पडणारे दोन प्रकार

१) ऱ्हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात.
उदा. - अ, इ, उ, ऋ, ऌ
  
२) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.
उदा. - आ, ई, ऊ

ब] उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार

१) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ

२) विजातीय स्वर :-भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...