मुख्य सामग्रीवर वगळा

NMMS फॉर्म बाबत

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी*
        *शिष्यव्रुत्ती योजना परीक्षा NMMS* 
                      *सन २०१८-१९* 

               *थोडक्यात ठळक माहिती* 

*१)* आॅन लाईन आवेदन पत्रे परिषदेच्या www. mscepune. in किंवा www. nmms. mscescholarshipexam. in या संकेतस्थळावर दि. १२.०९.२०१८ ते १७.१०.२०१८ या कालावधीत उपलब्ध.  
*२)* परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु.१००/- 
*३)* शाळा/संस्था संलग्नता शुल्क रु.२००/- प्रतीसंस्था. 
*४)* एकदा भरलेल्या आवेदन पत्रात पुन्हा दुरूस्ती नाही. 
*५)* परीक्षेची तारीख- ९ डिसेंबर २०१८. निकालाची घोषणा- फेब्रुवारी २०१९ च्या १ ल्या / २ ऱ्या आठवड्यात. निकाल व निवड यादी फक्त संकेत स्थळावरच उपलब्ध.
*६)* शिष्यव्रुत्ती दर- पात्र विद्यार्थ्यास इयत्ता ९ ते १२ पर्यंत वार्षिक रु. १२०००/- शिष्यव्रुत्ती.
*७)* शिष्यव्रुत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यव्रुत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व ११ वी मध्ये किमान ५५% गुण आवश्यक. ST/SC/VJ/NTB/NTC/OBC/SBC या आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ५०% गुण.
*८)* *परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे*- १- जात प्रमाणपत्र, २- आधारकार्ड, ३- उत्पन्नाचा दाखला, ४- वर्ग ७ ची गुणपत्रिका, ५- पासपोर्ट फोटो १.
*९)* शिष्यव्रुत्ती पात्र विद्यार्थ्यांना इ.१० वी मध्ये किमान ६०% व आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ५५% गुण मिळविणे आवश्यक. 
*१०)* प्रवेशपत्रे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध.
*११)* गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यव्रुत्तीसाठी निवड. 
*१२)* परीक्षेसाठी दोन विषय- बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी. 
*१३)* *पात्रता*- आई व वडिलांचे दोघांचे वार्षिक उत्पन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी.
       अ)- नोकरीत असलेल्यांनी आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार/तलाठ्यांचा सन २०१७-१८ चा उत्पन्नाचा दाखला.
        ब) इ.७ वी मध्ये सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५% व आरक्षित संवर्गासाठी किमान ५०% गुण आवश्यक.
*१४)* *परीक्षेसाठी अपात्र*-
        अ) विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी. 
         ब) शासकिय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
                            काही अडचण/शंका उद्भवल्यास मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दि. १२.०९.२०१८ ला प्रसिद्ध केलेली अधिसूचना बघावी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...