*ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले-मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा व मुलांनाही ऐकवावा. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवावा.
*MR लसीकरणा विषयीचा संवाद- अण्णा आणि नानांचा.*
*अण्णा:* अहो नाना, तुमच्या मुलांना MR ची लस जरुर द्या बरं !
*नाना:* अहो अण्णा, पण MR लस म्हणजे काय ?
*अण्णा:* MR लस म्हणजे *मिझल आणि रुबेला* या आजारावरची लस.
*नाना:* म्हणजे गोवर आणि रुबेला ?
*अण्णा:* हो. गोवर आणि रुबेला.
*नाना:* पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?
*अण्णा:* अहो नाना, गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.
*नाना:* अण्णा, ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?
*अण्णा:* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.
*नाना:* ते कसे ?
*अण्णा:* अहो अण्णा, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?
*नाना:* अहो अण्णा, मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?
*अण्णा:* रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.
*नाना:* हं! आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?
*अण्णा:* तुमची मुले ज्या शाळेत शिकतात तिथे, तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यवस्था केलीआहे.
*नाना:* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?
*अण्णा:* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी, नारु, पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अहो नाना, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लसीचा डोस अवश्य द्यावा.
*नाना:* अण्णा, खरोखरच तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेत. मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस अवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद,खूप खूप धन्यवाद.
*प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
*सर्वजण मिळून करुया,*
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l*
*आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा