मुख्य सामग्रीवर वगळा

बदल्या व संभ्रमावस्था

*जिल्हांतर्गत बदली बाबत अनेक शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे असे दिसते त्यावरुन आपणास खालील माहितीमुळे बदलीबाबत ची संभ्रमावस्था दुर होइल असे वाटते*

बदलीपात्र कोण ?

*सुगम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षक*

दिनांक ३१/०५/२०१९ रोजी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रातील सलग सेवा १० वर्ष पुर्ण झाली आहे आणि सध्याच्या शाळेमध्ये ३ वर्ष पुर्ण झाले आहेत असे सर्व शिक्षक बदलीपात्र आहेत . सुगम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकासाठी वरील दोनही अटी पुर्ण करणे बंधनकारक आहे असेच शिक्षक बदलीपात्र आहेत .(संगणकीय शब्दाचा काहीही संबंध नाही ) ( संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७ व ०८/०३/२०१९ )

*दुर्गम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षक*
दिनांक ३१/०५/२०१९ रोजी ज्या शिक्षकाची/ शिक्षिकेची सेवा दुर्गम क्षेत्रामध्ये ३ वर्ष पुर्ण झाली आहे असे सर्व शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत . यांची १० वर्ष सेवा पुर्ण होइपर्यंत याना कोणीही खो देवु शकत नाही. बदली मागायची का नाही हे यांच्या मनावर आहे . यानी २० पसंतीक्रम भरुन याना एकाही शाळेत बदली मिळाली नाहीतर असे शिक्षक त्याच शाळेत कार्यरत राहतील म्हणुन यांची बदली नाही झाली तरी त्याना कोणीही खो देवु शकत नाही . परंतु ज्या शिक्षकाची सेवा दुर्गममध्ये सलग १० वर्ष पुर्ण झाली आहे आणि सध्या ते त्याच शाळेत कार्यरत आहेत ते शिक्षक बदलीपात्र आसतात त्याना सेवाजेस्ठ शिक्षक खो देवु शकतो. (संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७ )

*महिलांसाठी प्रतिकुल दुर्गम क्षेत्रातील सेवा*
ज्या शाळा महिलांसाठी प्रतिकुल घोषित केलेल्या आहेत त्या शाळेतील महिलासुद्धा बदलीअधिकार प्राप्त शिक्षिका म्हणुन घोषीत केलेल्या आहेत त्याना दुर्गममधील ३ वर्ष सेवेची कोणतीही अट नाही ते बदलीस पात्र आहेत . बदली करुन घ्यावयाची का नाही हे त्यांच्या मनावर आहे त्यांची त्या क्षेत्रामध्ये १० वर्ष सेवा होइपर्यंत त्याना कोणीही खो देवु शकत नाही . परंतु ती शाळा महिलांसाठी प्रतिकुल म्हणुन घोषीत केलेली पाहिजे .( संदर्भ शासननिर्णय १५/०२/२०१८)

संवर्ग - ०१
शासन निर्णय २७/०२/२०१७ या शासन निर्णयातील संवर्ग ०१ चे नियम / अटी व शर्ती पुर्ण करतात आसे शिक्षक संवर्ग ०१ मध्ये मोडतात . याना बदली मागण्यासाठी बदलीपात्र शिक्षकाची सेवेची कोणतीही अट नाही . गत वर्षी जरी बदली झाली असली तरी आणि २०१८ च्या बदलीनंतर नविन निर्माण झाले असले तरी ते यावर्षी सुद्धा बदलीसाठी अर्ज करु शकतात . (संदर्भ शासनिर्णय २७/०२/२०१७ व २१/०२/२०१९)

शासननिर्णयानुसार जे शिक्षक संवर्ग ०१ साठी पात्र आहेत ते शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात . संवर्ग ०१ मध्ये पुर्वीपासुन आहेत आणि नव्याने निर्माण झाले आहेत आसे सर्व शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात .संवर्ग ०१ मधील जे शिक्षक सलग सेवेचे १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ३ वर्ष सेवेची अट या दोन्ही अटी पुर्ण करतात असे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत आसतात . या दोन अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतात परंतु बदलीसाठी अर्ज करु शकतात . शाळांचा पसंतीक्रम भरताना मात्र काळजीपुर्वक भरावा .(संदर्भ शासनिर्णय २७/०२/२०१७ व २१/०२/२०१९)

*संवर्ग ०२*
शासन निर्णय दिनांक २७/०२/२०१७ च्या शासन निर्णयातील संवर्ग २ च्या अटीशर्ती व नियमाची पुर्तता करतात आसे शिक्षक संवर्ग २ मध्ये येतात . तसेच त्यातील ज्या पती- पत्नी शिक्षकाच्या कार्यरत शाळेतील किंवा कार्यालयातील अंतर ३० किमीपेक्षा जास्त आहे , आसे शिक्षक संवर्ग ०२ च्या लाभासाठी पात्र आसतात . ( लक्षात घ्या ३० किमी सुद्धा जमत नाही . ३० किमी पेक्षा जास्त अंतर असले तरच अंतरासाठी पात्र ठरत आसतात ) . संवर्ग ०२ साठी बदलीपात्र शिक्षकाची सलग सेवेची १० वर्ष आणि सध्याच्या शाळेतील ०३ वर्ष सेवेची अट लागु नाही. संवर्ग ०२ च्या नियमात जे येतात ते बदलीसाठी अर्ज करु शकतात . ( संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७)

संवर्ग ०२ मधील जे शिक्षक सलग सेवेचे १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ३ वर्ष सेवेची अट या दोन्ही अटी पुर्ण करतात असे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत असतात . या दोन अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतात परंतु बदलीसाठी अर्ज करु शकतात .

मे/जुन २०१८ मध्ये ज्या शिक्षकांची बदली संवर्ग ०२ मध्ये झालेली आहे अशा दोघा जोडीदारापैकी एकाने सुट घेतली होती म्हणजे ते लॉक झाले होते आसे शिक्षक सलग सेवेची १० वर्ष पुर्ण करत आसतील आणि सध्याच्या शाळेत ०३ वर्ष पुर्ण करत आसतील तर असे शिक्षक बदलीपात्र आसतात व त्यांचे नाव बदलीपात्र यादीमध्ये येत आसते . शासननिर्णयातील तरतुदीनुसार एकदा बदली झाल्यानंतर ०३ वर्ष बदलीस पात्र नाही या अटीनुसार ज्या पती- पत्नी शिक्षकापैकी एकाची बदली झाली आणि त्या बदली झालेल्या शिक्षकाने आपल्या जोडीदाचा आयडी टाकुन त्यास लॉक केले होते त्यानुसार दोघानाही ०३ वर्ष्यापर्यंत लॉक केले जाइल का नाही ही बाब अद्याप जरी स्पस्ट झाली नसली परंतु शासननिर्णयातील एक एकक युनिट नुसार सुट घेतलेल्या बदलीपात्र जोडीदारास खो मिळाला तर शासननिर्णय २७/०२/२०१७ नुसार दोघानाही एक एकक युनिट म्हणुन बदलीने जिल्ह्यातील कोणत्याही एकाच शाळेत किंवा ३० किमीच्या परिघातील शाळेत पदस्थापना देण्याची तरतुद आहे .

बदलीपात्र शिक्षकाच्या जागा संवर्ग ०१,०२,०३ मधील शिक्षक व संवर्ग ०४ मधील सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक सेवाकनिस्ठ बदलीपात्र शिक्षकाच्या जागा मागु शकतात . संवर्ग ०१,०२,०३,०४ मधील शिक्षक रिक्त जागेच्या शाळा सुद्धा मागु शकतात .

संवर्ग ०१,०२ मध्ये येणारे शिक्षक सलग सेवेची १० वर्ष व सध्याची ०३ वर्ष या दोन्ही अटी पुर्ण करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत आसतात व या दोन्ही अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतात परंतु बदली हवी आसल्यास बदलीसाठी अर्ज करु शकतात .

संवर्ग ०३ च्या अटी पुर्ण करणारे शिक्षक/शिक्षिका बदलीसाठी अर्ज करु शकतात परंतु त्याना १० वर्ष पुर्ण झाल्याशिवाय कोणीही खो देवु शकत नाही .

महिलांसाठी प्रतिकुल घोषीत केलेल्या शाळेत सध्या कार्यरत आसलेल्या महिला शिक्षिका बदली हवी असल्यास बदलीसाठी अर्ज करु शकतात परंतु त्याना १० वर्ष पुर्ण झाल्याशिवाय कोणीही खो देवु शकत नाही .

संवर्ग ०३ मध्ये म्हणजेच दुर्गम क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत असलेले परंतु सध्या संवर्ग ०१,०२ च्या नियमात येणारे शिक्षक त्या त्या संवर्गातुन बदलीसाठी अर्ज करु शकतात त्यासाठी संवर्ग ०१,०२ चे बदली अर्ज भरत असताना संवर्ग ०३ चे ही पोर्टल ओपन झाले पाहिजे तरच संवर्ग ०३ मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाना संवर्ग ०१ व ०२ मध्ये बदलीसाठी अर्ज करता येइल . संवर्ग ०२ चे पोर्टल चालु असताना संवर्ग ०३ पोर्टल चालु नसेल आणि संवर्ग ०३ चा जोडीदार संवर्ग ०२ साठी बदलीपात्र असेल तर संवर्ग ०३ मध्ये कार्यरत असलेल्या जोडीदाराच्या शाळेपासुन ३० किमी च्या परिघामध्ये बदली मागु शकतो .

संवर्गनिहाय याद्या तयार करण्याची कोणतीही अधिसुचना नाही आणि तशा याद्या घोषित केल्यामुळे काहीही लाभ होणार नाही कारण संवर्ग ०१ मधील शिक्षक बदली मागेल किंवा सुट घेइल हे आपणास माहित नसते . संवर्ग ०२ मधील कोणता जोडीदार बदली मागेल हे निस्चित नसते .संवर्ग ०३ मधील शिक्षक बदली मागेल किंवा सुट घेइल हेही निश्चित नसते म्हणुन संवर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याचा काहीही लाभ होणार नाही .

आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत आणि ज्याना या शाळेत काम करावयाचे आहे असे लिहुन दिले आहे त्यांची बदली होणार नाही व ज्यानी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काम करावयाचे नाही असे लिहुन दिले आहे त्यांची बदली होणार आहे त्यांची मॅपींग केली जाणार आहे .ती यादी राज्यस्तरावरुन जिल्हास्तरावर येणार आहे .

बदली प्रक्रिया सुरु होत असल्यामुळे आपल्या शाळेचे स्टाफ पोर्टल ओपन करुन पहावे . आपले नाव स्टाफ पोर्टलला आहे की नाही हे पहावे . जर नसेल तर वरिष्ठ कार्यालयास कळवावे .
कोणत्याही चुकीच्या माहितीच्या अधारे बदलीचा लाभ घेवु नये .

प्रत्येक संवर्गनिहाय बदली अर्ज करताना शासनस्तरावरुन सुचना आल्यातर सर्व शिक्षकांसाठी सोयिस्कर होइल किंवा त्यासाठी राज्यसमन्यक व सहाय्यक कक्षअधिकारी मंत्रालय मुंबई श्री प्रदिप भोसले सर यांच्या सुचना चालु होणे अति महत्वाचे आहे .

सर्व बदल्या २७/०२/२०१७ च्या शासननिर्णयानुसार संवर्गनिहाय टप्याटप्य्याने झाल्या तर सर्वांसाठी अतिपारदर्शक होइल .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...