*निष्ठा प्रशिक्षण*
मित्रांनो ,
राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ . १ ली ते इ . ८ वीस अध्यापन करणाऱ्या १०० % शिक्षक , मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी NISHTHA National Initiative for School Heads ' and Teachers ' Holistic Advancement ) या प्रशिक्षणाच्या राज्यस्तरीय व तालुकानिहाय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे .
निष्ठा (NISHTHA) प्रशिक्षण ?
मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने देशभरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी निष्ठा (NISHTHA - National Initiative for School Heads and Teachers Holistic Advancement) हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आलेला आहे. सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी माहे 30डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये करण्यात येणार आहे.
NISHTHA या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख हेतू शालेय शिक्षणामधील गुणवत्ता वाढविणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीसाठी अध्यापन करणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक,पर्यवेक्षीय यंत्रणा व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी एकत्रितपणे प्रशिक्षणाची रचना करण्यात आलेली आहे.
निष्ठा या प्रशिक्षणामध्ये खालील विषयांचा समावेश आहे.
1)अध्ययन निष्पती(Learning Outcomes)
2)क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन
विद्यार्थी केंद्रित अध्यापन शास्र
3)शाळा सुरक्षितता व सुरक्षा
4)वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये
5)समावेशित शिक्षण
6)अध्ययन अध्यापन माहिती व तंत्रज्ञानासह कुत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर
7)आरोग्य व योगा
8)ग्रंथालय
9)पर्यावरण क्लब
10)किचन गार्डन
11)यूवा क्लब
12)शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये
13)शाळापूर्व शिक्षण
14)आंनददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन
व इतर महत्त्वाचे काही विषयांचा समावेश आहे.
🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा